• जून महिन्यात कमी पाऊस पडणार आहे. त्यामुळे पेरणी उशिरा होईल
  • जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे.
  • ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार असून, अतिवृष्टी देखील होईल
  • सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी असेल
  • पण अवकाळी पाऊस भरपूर होणार असून, पिकांचे नुकसान होईल

 असा पीक पाण्याचा अंदाज

  • यावर्षी पिकांवर रोगराई राहिल
  • कापूस पीक मध्यम होईल, कापसात तेजी असेल
  • ज्वारी सर्वसाधारण राहिल
  • तूर पीक चांगले असेल
  • मूग पीक सर्वसाधारण असेल
  • उडीद मोघम सर्वसाधारण
  • तीळ सर्वसाधारण मात्र नासाडी होईल
  • बाजरी सर्व साधारण मात्र नासाडी होईल
  • तांदुळाचं चांगलं पीक येईल
  • गहू सर्वसाधारण बाजार भाव तेजीत राहिल
  • हरभरा अनिश्चित कमी जास्त पीक येईल. मात्र नुकसान सुद्धा होईल

देशा संबंधीही केली भविष्यवाणी

  • संरक्षण मजबूत राहिल, मात्र शेजारील राष्ट्राच्या कुरघोड्या असतील
  • देशाची आर्थिक परिस्थिती खालावेल, चढउतार होईल

राजा कायम राहील

  • राजा कायम आहे, पण राजाला अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच राजा कायम तणावात असेल.
  • राजकीय उलथापालथ होत राहिल
  • नैसर्गिक आपत्ती येत राहतील, भूकंप प्रमाण जास्त राहील