Benefits of papaya
फळं आहारात समाविष्ट केल्याने अनेक जीवनसत्वे मिळतात, तसेच आजारांचा धोका कमी होतो. आज आपण पपई या फळाचे गुणधर्म जाणून घेऊयात…
पपई खाण्याचे अनेक फायदे
वजन कमी करणे म्हणजे खूप मेहनत करावी लागते. त्यासाठी मध्येच सोडून असे होत नाही. बऱ्याच वेळा खूप स्ट्रिक्ट डाएट आणि हेवी वर्कआऊट करावे लागते. पण, अनेकवेळा असे होते की, आपल्याला जितके अपेक्षित आहे, तितके कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला अशा त्य फळांचे सेवण करणे गरजेचे आहे, अ जी तुम्हाला लगेच बाजारात मिळतील आणि ती शोधण्यासाठी तुमचा बराच वेळ जाणार नाही. इतकेच काय तर त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत, ते फळ म्हणजे पपई. पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत.
सकाळी नाश्त्यात तुम्ही पपई खाऊ शकता. नाश्त्यात पपईचे सॅलेड खा. त्याने तुमच्या शरीराला पोषक तत्त्व मिळतात. तर हे ओट मिल्कसोबत खाल्ल्यास तुम्हाला लवकर भूक लागत नाही.दुपारच्या जेवणाच्या वेळीदेखील तुम्ही पपईचे सेवन करू शकता. त्यात जर तुम्ही पालक, टोमॅटो, मीठ, लसूण आणि लिंबूचा रस घातला तर त्यातील न्यूट्रिशन्सचे प्रमाण वाढते. असे खायचे नसेल तर तुम्ही पपईचा ज्यूस पिऊ शकता. याने वजन लवकर कमी होईल.
संध्याकाळीदेखील नाश्त्यात तुम्ही पपईचे सेवन करू शकता. यासाठी पपई आणि अननसची स्मुदी तयार करा. त्याने तुम्हाला ई लवकर भूक लागणार नाही. रात्रीच्या जेवणातदेखील तुम्ही पपई ठेवू शकता. रात्रीचे जेवण झाल्यानंतर तुम्ही स्वीट डिश म्हणून पपईचे सेवन करा. याने शरीरातील फक्त फॅट कमी होणार नाहीत तर बॉडी डिटॉक्स होण्यासही मदत होईल, अपचन आणि जळजळपासून सुटका :- पपईमध्ये असलेले प्रोटिन हे पचन करण्यास आणि जळजळ कमी होण्यास महत्त्वाची ठरतात. त्यामुळे रोजच्या आहारात पपईचा समावेश केल्यास नक्कीच फायदा होईल.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
पपईमध्ये व्हिटॅमिन-ई मोठ्या प्रमाणात असते. तर व्हिटॅमिन-ई असणाऱ्या फळांचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन-के ची कमतरता असेल तर हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते. व्हिटॅमिन-के हे कॅल्शियम शोषण घेण्यास हाडांना मदत करते.
- Advertisement -
- Advertisement -
(टीप : सदरात दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)