Side effect of eating tomatoes : अनेकांना टोमॅटोची चटणी तसेच कच्चा टोमॅटो खाण्यास आवडतो. तसेच सलाड म्हणून देखील टोमॅटो खाल्ला जातो. तथापि, आपण ऐकले असेल की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असू शकतो. त्याचप्रमाणे टोमॅटो खाणे जितके फायदेशीर आहे तितकेच ते जास्त खाणे देखील हानिकारक आहे. यामुळे कोणत्याही गोष्टीचे सेवन हे प्रमाणात असणे गरजेचे आहे.
वास्तविक, टोमॅटोमध्ये जीवनसत्त्वे, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात, परंतु जर ते जास्त प्रमाणात घेतले तर ते नुकसान देखील करू शकतात. त्यामुळे आज आपण टोमॅटोच्या अतिसेवनाचे काय तोटे आहेत ते जाणून घेऊया
ऍसिडिटी वाढू शकते : टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे टोमॅटोमध्येही अधिक गुणधर्म असतात. त्यामुळे टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे टोमॅटो मर्यादित प्रमाणातच खावेत.
गॅस समस्या : टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने पोटात गॅस तयार होण्याची समस्यां निर्माण होत असते. यामुळे टोमॅटोचे जास्त सेवन करणे टाळावे. वास्तविक, टोमॅटो हे पोटात गॅस निर्माण होण्याचे प्रमुख कारण बनू शकते. त्यामुळे गॅसची समस्या टाळायची असेल तर टोमॅटो मर्यादित प्रमाणातच खा.
- Advertisement -
- Advertisement -
स्टोन : ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांच्यासाठी देखील टोमॅटो घातक आहे. स्टोनच्या रुग्णांनी चुकूनही टोमॅटो खाऊ नयेत. वास्तविक, टोमॅटो बियाण्यांमुळे, स्टोन वाढण्याची समस्या असू शकते. दुसरीकडे, टोमॅटो जरी खाल्ले तरी त्यांच्या बिया वेगळे करून खा. जेणेकरून या त्रासाला सामोरे जावे लागेल.
छातीत जळजळ : टोमॅटो जितके फायदेशीर आहेत तितकेच ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते हानिकारक देखील असू शकतात. अनेकांना छातीत जळजळ होऊ शकते, कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे गॅसची समस्या वाढते आणि छातीत जळजळ होऊ शकते. जर तुम्हाला जास्त टोमॅटो खायला आवडत असतील तर आताच सावधान.
तसेच कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास जाणवल्यास तातडीने आपण वैद्यकीय सल्ला घ्यावा. तसेच डॉक्टरांच्या तसेच आहार तज्ज्ञांचा सल्ला नेहमी घ्यावा जेणेकरून अडचणींचा सामना करावा लागणार नाही.