How to remove tanning from face : मे महिना संपत आला आहे मात्र अद्यापही उन्हाळ्याची तीव्रता कायम आहे. उन्हाचा वाढता पारा पाहता अंगाची लाहीलाही होत असते. कडाक्याच्या उन्हाळ्यात बहुतेक लोकांना त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात घाम येणे, सूर्यप्रकाश यांमुळे त्वचेवर त्यांचे परिणाम हे तात्काळ जाणवू देखील लागतात. त्वचा काळवंडणे (टॅनिंग) ही समस्या कोणत्याही प्रकारच्या त्वचेला होऊ शकते. त्याचबरोबर टॅनिंगची ही समस्या टाळण्यासाठी महिला सनस्क्रीनचा वापर करतात. पण सनस्क्रीनचाही त्वचेवर फारसा असा काही परिणाम होत नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात त्वचा काळवंडयापासून सुटका मिळेल.
लिंबू : व्हिट्यामिन सी ने परिपूर्ण असलेले लिंबू हे अनेक समस्यांमध्ये प्रभावी ठरते. यातच उन्हाळ्यात टॅनिंग काढून टाकण्यासाठी लिंबू ही एक अत्यंत प्रभावी गोष्ट आहे. यामध्ये असलेले व्हिटॅमिन अँटी ऑक्सिडेंट म्हणून काम करतं आणि त्यात असणारं अॅसिड त्वचेच टॅनिंग काढून टाकण्यास मदत करतं.
काकडी आणि गुलाबपाणी : नितळ त्वचेसाठी गुलाबपाणी वापरले जाते हे आजवर तुम्ही ऐकले असेल की पाहिले देखील असेल. उन्हाळ्यात त्वचा काळवंडते यासाठी देखील गुलाबपाणी प्रभावी ठरू शकते. आपण काकडी आणि गुलाबाच्या पाण्यातील फ्लॅक्स टॅन देखील काढू शकता. काकडीचा रस आणि गुलाबपाणी समप्रमाणात मिसळून कॉटन बॉलच्या मदतीने त्वचेवर लावा. काही वेळानंतर थंड पाण्याने त्वचा धुवा. यामुळे टॅनचा प्रभाव नाहीसा होईल.
हळद आणि बेसन : त्वचेच्या समस्यां दूर करण्यासाठी हळद ही अत्यंत प्रभावी असते हे आजवर आपण पहिले असेल. हळद आणि बेसनचा पॅक त्वचेला एक्सफोलिएट करतो आणि टॅनिंग काढून टाकतो. यासाठी दोन चमचे बेसनात अर्धा चमचा हळद मिसळून टॅनिंग झालेल्या जागेवर लावू शकता. ते वाळल्यानंतर धुवून टाका. यामुळे त्वचा काळवंडणे ही समस्या दूर होऊ शकते.
- Advertisement -
- Advertisement -
सनस्क्रीन : बरेच लोक उन्हात बाहेर जातानाच सनस्क्रीन वापरतात. तुम्हाला असे वाटते की केवळ हेच तुमची त्वचा टॅनिंगपासून वाचवेल, तर तसे नाही. अगदी 10 ते 15 मिनिटांचा सूर्यप्रकाश खूप त्रासदायक ठरू शकतो आणि त्याशिवाय कायमचे नुकसान देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत, सनस्क्रीन लावताना, तुमचे उत्पादन मधल्या बोटात आणि तर्जनीमध्ये येईल तेवढे हातात घ्या. यानंतर, त्वचेवर योग्य प्रकारे सनस्क्रीन लावा.