शिर्डी : येथील श्री साईबाबांच्या (Shirdi Saibaba)झोळीत उन्हाळ्याच्या ४५ दिवसांच्या सुट्टीत सुमारे ४७ कोटी रुपयांचे घसघशीत दान जमा झाले असून या दरम्यान सुमारे २७ लाख साईभक्तांनी श्री साईसमाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे यात भाविकांनी दोन हजारांच्या नोटांचे दान साईबाबा यांच्या चरणी केले आहे.
२७ लाख भाविकांनी घेतले दर्शन
देशातील नंबर दोनचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीतील श्री साईबाबांच्या दानपेटीत दिवसेंदिवस वाढ होत असून भाविकांच्या दानातून साईबाबा संस्थानकडे प्राप्त झालेल्या जवळपास तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहे तर, अर्धा टन सोने व पाच टनाहून अधिक चांदी आहे. यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दि. २५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत २७ लाख देश विदेशातील भाविकांनी साईसमाधीचे मनोभावे दर्शन घेतले असून या दिड महिन्याच्या कालावधीत सुमारे ४७ कोटी रुपयांचे घसघशीत दान साईबाबांच्या दानपेटीत टाकले आहे.
४७ कोटी रुपयांचे भरभरून दान
यामध्ये देणगी काऊंटर २५ कोटी रुपयांचे दान जमा झाले असून दक्षिणा पेटीत १० कोटी रुपये याबरोबरच १ कोटी २० लाख रुपये किमतीचे २ किलो सोने, तर ३७ लाख रुपये किमतीचे ५२ किलो चांदी यांचा समावेश आहे. असे एकूण ४७ कोटी रुपयांचे भरभरून दान साईबाबांच्या दानपेटीत जमा झाले आहे. त्याचप्रमाणे मोफत दर्शन रांगेतून सुमारे २१ लाख साईभक्तांनी साईबाबांच्या समाधीचेदर्शन घेतले तर सशुल्क पासेसद्वारे सुमारे ६ लाख भाविकांनी दर्शन घेतले. या पंचेचाळीस दिवसांच्या कालावधीत साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात २२ लाख भाविकांनी साईबाबांच्या प्रसादाचा लाभ घेतला आहे.
दोन हजारांच्या नोटांचे अडीच कोटी
देशात दोन हजार रुपयांच्या नोट बंदीच्या निर्णय झाल्यानंतर दि. २० मे ते २१ जून २०२३ पर्यंत एका महिन्यात Shirdi Saibaba च्या दानपेटीत दोन हजारांच्या ४ हजार नोटा तसेच देणगी काऊंटरवर ८ हजार नोटा असे एकूण १२ हजार नोटा याप्रमाणे २ कोटी ४० लाख रुपये साईबाबा संस्थानकडे प्राप्त झाले आहे.राष्ट्रपती शिर्डीला येणार देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या दि. ७ जुलै रोजी शिर्डी येथे येणार आहेत. साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षात तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेही शिर्डीला आले होते. त्यापाठोपाठ आता मुर्मू ह्याही शिर्डीला येत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
ही बातमी वाचा ..असे मिळवा दुग्ध व्यवसाय कर्ज आणि बना यशस्वी उदयोजक !