Ola electric scooter booking करायचा जर तुम्ही विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. तुमच्याकडे सध्या अग्रीम रक्कम अर्थात डाऊन पेमेन्ट भरण्यासाठी काही पैसे नसले तरी एक रुपया न भरता तुमच्या आवडीची ola electric scooter तुम्ही घरी आणू शकता. तुम्हाला याकरिता नेमके काय करावे करावे लागेल याबाबत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या बातमीत देणार आहोत.
पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांना इलेक्ट्रिक स्कुटरचा उत्तम पर्याय आहे. त्यात वेग आणि मायलेज याकरिता ओला स्कुटर बेस्ट आहेत. ola electric scooter इलेक्ट्रिक स्कूटर भारतात ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. अनेक लोक आता पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत. ओला इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स सध्या भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. मुख्यतः ओला इलेक्ट्रिक कंपनीने भारतातील इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये फार कमी कालावधीत चांगली कामगिरी केली आहे. कंपनी देशातील इलेक्ट्रिक स्कूटरची सर्वात मोठी विक्री करणारी कंपनी बनली आहे.
दर्शनाच्या मारेकऱ्याला अटक; खुनाचं कारण आलं समोर
सध्या बाजारात कंपनीच्या तीन इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. ज्यामध्ये Ola S1, Ola S1 Pro आणि Ola S1 Air स्कूटरचा समावेश आहे. यापैकी S1 स्कूटर सर्वात स्वस्त आहे. तुम्हीही ओला इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल पण कमी बजेटमुळे अडकले असाल तर बजेटचे टेन्शन विसरून जा. आता ओला कंपनीने तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही रुपये न भरता ओला स्कूटर खरेदी करू शकता.
- Advertisement -
- Advertisement -
ओला इलेक्ट्रिकने आपल्या ग्राहकांसाठी उत्तम ऑफर्स आणल्या आहेत. IDFC First Bank आणि L&T Financial Services (IDFC First Bank and L&T) सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने, ते S1 वर अतिशय कमी व्याजदरावर कर्ज देत आहे. IDFC First Bank आणि L&T Financial Services फक्त 6.99% व्याजदराने 60 महिन्यांसाठी म्हणजेच 5 वर्षांसाठी कर्ज देतील. विशेष म्हणजे यासाठी ग्राहकांना कोणतेही डाउन पेमेंट करावे लागणार नाही.कंपनी भारतीय बाजारपेठेत सर्वात स्वस्त EMI हमी देखील देत आहे. Ola S1 ची किंमत 129,999 रुपये आहे. आता तुम्ही ही स्कूटर 1 रुपया न देता घरी आणू शकता. ही संधी सोडू नका कारण अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत.
ही बातमी वाचा ..असे मिळवा दुग्ध व्यवसाय कर्ज आणि बना यशस्वी उदयोजक !