what is cyber crime
अकोला – ऑनलाईन व्यवहार करताना तुम्ही खबरदारी घेतली नाही तर, फसवणूक झाल्याशिवाय राहत नाही. आर्थिक फसवणुकीच्या सायबर गुन्ह्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे. वेगवेगळे आमिष दाखवून लुबाडणूक करणारी टोळी सक्रिय आहे. अश्या फसवणुकीपासून सावधान राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने केल्या जात असते. मात्र तरी सुद्धा नागरिक आवश्यक काळजी घेत नाहीत, परिणामी त्यांना आर्थिक फसवणुकीचे बळी (Cyber crime)ठरावे लागते. अशीच घटना अकोला येथे घडली आहे. सिटी कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील एका ५८ वर्षीय वृध्दाला आलेल्या मोबाइल क्रमांकावरून त्यांच्या बँक खात्यातून ४ लाख ९७ हजार ३४ रुपयांनी गंडा घातला आहे. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये ( akola city police) दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
पाच लाख रुपयांचा गंडा
गेल्या काही वर्षात सर्वच क्षेत्रात डिझिटल व्यव्यहार वाढले आहेत. हे व्यवहार सोपे आणि जलद गतीने होत असतात. आजकाल लोक रोख व्यवहार सोडून डिझिटल तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसतात. ,वेबसाईट, मोबाईल अँप, वॉलेट, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, प्रीपेड कार्ड, यूपीआयसारख्या विविध पेमेंट सिस्टीम याद्वारे डिजिटल व्यवहार (Digital transactions) केल्या जातात. अचानक अशा व्यवहारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. वाढत्या व्यवहारांबरोबर त्यातील धोक्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांना फसवणुकीला सामोरे जावे लागत आहे. असाच काहीसा प्रकार अकोला शहरातील महावीर बन्सीलाल जैन (५८) राहणार न्यू राधाकिसन प्लॉट यांच्या सोबत घडला असून त्यांना जवळपास पाच लाख रुपयांचा गंडा घातला गेला आहे.
अशी झाली फसवणूक
अकोल्याच्या महावीर बन्सीलाल जैन यांना एका अनोळखी व्यक्तीच्या मोबाइल क्रमांकावरून फोन आला. वीज बिल थकीत असून त्याचा भरणा करण्याबाबत संबंधित व्यक्तीने जैन यांना सांगतिले. तसेच महावितरणचे ऑनलाइन देयके अदा करण्यासाठी अॅप डाउनलोड करण्याचे सूचित केले. त्यांनी अॅप डाउनलोड करताच त्यांना एक लिंक पाठवली गेली. त्या लिंकवर क्लिक केल्यावर जैन यांच्या बँक खात्यातून ४ लाख ९७ हजार ३४ रुपये काढून ऑनलाइन फसवणूक केली. याप्रकरणी महावीर बन्सीलाल जैन यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, कलम ६६ ड माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० गुन्हा नोंद केला आहे. या ऑनलाइन फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडू हीत आहेत.
अकोला पोलिसांचे आवाहन!
सायबर गुन्हयाच्या (Cyber crime) घटनेत गेल्या काही दिवसात वाढ झालेली आहे. नागरिकांनी फेक कॉलपासून सावध राहून आलेल्या कोणत्याही मोबाइल फोनची लिंक डाउनलोड करू नये, जेणेकरून नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक होणार नाही. याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे आणि तातडीने जवळील पोलिस स्टेशन किंवा अकोला सायबर पोलिस स्टेशन येथे संपर्क करावा, असे आवाहन अकोला पोलिस दलाच्या (akola city police) वतीने करण्यात आले आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान या संबंधातील नवा कायदा तयार असून लवकरच तो अमलात येईल. सायबर संबंधित तक्रारींचे निवारण लवकरात लवकर होण्यासाठी सरकारनं विविध उपाययोजना केल्या आहेत. विशेष म्हणजे सायबर गुन्ह्यांचा तपास जलदगतीने झाला पाहिजे याकरिता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
पुढील गोष्टी नक्की ध्यानात ठेवा!
ऑनलाईन करावेत पुरेशी काळजी घेऊन करावे. व्यवहार करणे सोपे असून त्यामुळे आत्मविश्वासात वाढ होते. संकेतस्थळाची सुरक्षितता तपासून घ्यावी.अधिकृत संकेतस्थळावायून किंवा अँपवरून व्यवहार करावेत. थर्ड पार्टी अँप डाउनलोड करू नये. अनोळखी व्यक्तीने लिंक शेअर केली असेल तर त्यावर क्लिक करू नये. बक्षिसांचे मेल डिलीट करावे ,या जगात कोणी कोणालाही फुकट काहीही देत नाही. आपली गोपनीय माहिती जसे आधार कार्ड, पॅन, खाते क्रमांक, कार्ड नंबर, सिव्हीव्ही, लॉग इन आयडी, पासवर्ड, ओटीपी कुणालाही शेअर करू नये. शक्य असल्यास ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र डिव्हाईस वापरावा. जर असे करणे अशक्य असेल तर आपला फोन, लॅपटॉप पीसी अन्य व्यक्तीस वापरण्यास देऊ नये. क्यू आर कोडची गरज पैसे देण्यासाठी लागते, मिळवण्यासाठी नाही हे कायम लक्षात ठेवावे.आपल्या खात्यातील शिल्लक, आलेले एसएमएस, मेल ठराविक कालावधीने तापासावेत. काही त्रुटी आढळल्यास त्वरित निदर्शनास आणावी.आपण ज्यांच्याशी व्यवहार करतो त्याच्या तक्रार निवारण पद्धती, टोल फ्री नंबर आपल्या हाताशी असावेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक संस्थेकडे त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा असते त्यांचा लाभ घ्यावा.