Farm Scheme : मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांनी जवळच्या सीएससी केंद्रामार्फत किंवा ऑनलाईन नोंद करुन वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची अनिश्चितता व उपलब्धता यामुळे सिंचानाअभावी पिक उत्पादनात मोठया प्रमाणात घट येते. जिथे पाण्याचा ताण जास्त पडतो तेथील पिके नष्ट देखील होतात. पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. जेव्हा मोठया प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा ओढे, नाले, नदी इ. व्दारे वाहून जाणारा अतिरिक्त अपधाव त्याची साठवणुक करण्याकरिता शेतावर शेततळयासारखी पायाभुत सुविधा उभी करणे हा एक उत्तम पर्याय आहे. शेततळयामुळे पिकाला, फळबागेला संरक्षित सिंचन मोठया प्रमाणात उपलब्ध होवु शकते. या योजनेत सहभागी होण्याकरिता अर्जदार शेतकऱ्यांकडे किमान ०.४० हे. क्षेत्र असणे असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणेस कमाल मर्यादा नाही. तसेच अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामुहिक शेततळे इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकाकरिता शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
सध्याची पाणी टंचाई परिस्थिती पाहता भविष्यात फळबाग वाचवण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले विहिर व बोअरवेलचे तसेच परतीच्या पावसाव्दारे उपलब्ध होणारे पाणी अस्तरीकरणासह शेततळे योजनेचा लाभ घेवुन वाचविणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होवुन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. या योजनेतंर्गत अस्तरीकरणाशिवाय शेततळयासाठी रक्कम 75 हजार रुपये अनुदान मिळते तसेच अस्तरीकरणासह रक्कम 1 लक्ष 50 हजार रुपये अनुदान मिळते.
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतंर्गत वैयक्तीक शेततळे घटकासाठी खालीलप्रमाणे आकारमान व अनुदान देय राहील. वैयक्तीक शेततळे अंतर्गत आकारमानानुसार अनुदान याप्रमाणे : 15X व 15X3 करीता 23 हजार 881 रुपये, 20X20X3 करीता 32 हजार 034 रुपये, 20X20X3 करीता 43 हजार 678 रुपये, 25X20X3 करीता 55 हजार 321 रुपये, 25X25X3 करीता 70 हजार 455, 30X25X3, 30X30X3 व 34X34X3 करीता प्रत्येकी 75 हजार रुपये काम पुर्ण झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत शेतकऱ्याच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येते. यापुर्वी शेततळयाच्या लाभ न घेतलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सीएससी केंद्रा मार्फत किंवा वैयक्तिक रित्या ऑनलाईन नोंद करुन मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतंर्गत वैयक्तिक शेततळे