Gajanan Maharaj
शेगांव: देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराजांचे 145 व्या प्रगट दिन उत्सवास 6 फेब्रुवारीला मंदिरत महारुद्र स्वाहाकार याग व विविध धार्मिक कार्यक्रमाने प्रारंभ झाला. संस्थानमध्ये सोमवार रोजी सकाळी ११ वाजता श्री महारूद्रस्वाहाकार यागास राक्षसभुवन येथील ब्रम्हवृंदाचे मंत्रोपचारात विधिवत पुजनाने सुरुवात झाली. उत्सवा निमित्त संतनगरीत दररोज ठिकठिकाणाहून असंख्य भजनी दिंड्यांचे आगमन होत आहे. तसेच श्रींचे दर्शनास भाविक भक्ताची मोठी गर्दी होत असलयाचे चित्र सध्या संतनगरीत पाहायला मिळत आहे.
विविध धार्मिक कार्यक्रम
श्री संत गजानन महाराज मदिरात 6 ते 13 फेब्रुवारी दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.यात सकाळी ५ ते ६ काकडा ,७.१५ ते ९ .१५ भजन ,दुपारी ४ ते ५ प्रवचन ,सायंकाळी ५ ते५:३० हरिपाठ रात्री ८ ते १० किर्तन होणार आहे.६ फेब्रुवारी ह भ प मंगेशबुवा वराडे , मोताळा , ७ फेब्रुवारी ह भ प प्रकाशबुवा शारत्री , धुळे, ८ फेब्रुवारी ह भ प रामबुवा डोंगरे , जाटनांदूर, ९ फेब्रुवारी ह भ प सचिदानंदबुवा कुलकर्णी,परभणी १० फेब्रुवारी ह भ प ज्ञानेश्वरबुवा ईटखेडे, मेहूण ११ फेब्रुवारी ह भ प अनंतबुवा बिडवे बार्शी १२ फेब्रुवारी ह.भ.प.श्रीहरी बुवा वैणव जालना,१३ फेब्रुवारी ह.भ.प.श्रीराम बुवा ठाकूर परभणी यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तर १३ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री संत गजानन महाराज प्रगटदिन असल्याने या दिवशी सकाळी १० ते १२ ह भ प श्रीरामबुवा ठाकूर परभणी याचे शेगावी श्रीच्या प्रागट्यानिमित्त किर्तन होईल.
ठिकठिकाणच्या भजनी दिंड्या दाखल
सोमवार ६ फेब्रुवारी रोजी श्री महारूद्रस्वाहाकार यागाचे पुजन संस्थानचे सेवाधारी विश्वास्त यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील वेदमूर्ती ब्राह्मणवृंदाद्वारे यागाचे पुजन झाले.श्रीच्या मदिरात सर्व परिसरात केळीचे खांब तसेच आंबाच्या पानाचे तोरणे लावली आहेत. मंदिराची आकर्षक रंग रांगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० या श्री महारूद्रस्वाहाकार यागाची पुर्णाहूती होईल. मंदिरातून दुपारी ‘श्री ‘ ची पालखी अश्व, रथ, मेणासह परिक्रमेस निघेल. परीक्रमे नंतर १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ ह. भ. प. प्रमोदबुवा राहणे पळशी यांचे कीर्तन होईल. यानंतर या प्रगटदिन उत्सावाची सांगता होणार आहे श्री प्रगटदिन उत्सवास सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र, मध्येप्रदेश,या ठिकाणाहून भजनी दिंडया जय गजानन श्री गजानन … गण गण गणात बोते.. च्या गजरात दाखल होत आहेत.