Gajanan Maharaj Palkhi
सेवा,स्वच्छता , आणि शिस्त यासाठी देशात नावलौकिक प्राप्त असलेले श्री संत गजानन महाराज यांचे समाधी स्थळ संत नगरी शेगाव येथे आहे. दररोज लाखो भाविक देश विदेशातून संतनगरी शेगाव येथे दर्शनासाठी येत असतात. श्री संत गजानन महाराज ( shri sant gajanan maharaj )संस्थांनच्या वतीने वर्षभर धार्मिक उपक्रम राबविल्या जात असतात. याच उपक्रमातील एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे श्रींची पालखी उत्सवाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात.
पालखीचे 13 जून रोजी प्रस्थान
राज्यभरातील भाविकांना आता पंढरीच्या वारीची ओढ लागली आहे. विदर्भातील प्रसिद्ध श्री गजानन महाराज संस्थानची पालखीचे 13 जून रोजी सकाळी 7 वाजता पंढरीनाथाचे दर्शनासाठी पायदळ वारीने प्रस्थान होणार आहे. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठूरायाचे दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातून लाखो वारकरी भाविक आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होतात.यंदा 17 जुलै ला देवशयनी आषाढी एकादशी आहे.त्या पार्श्वभूमीवर गावोगावीच्या भाविकांनी पंढरीच्या वारीची ओढ लागली असून शेतीची तसेच इतर कामे उरकून घेण्याची लगबग सगळीकडे सुरू आहे.
पालखीचे यंदाचे 55 वे वर्ष
पंढरीला पायदळ वारीने जाण्याची वारकरी सांप्रदायातील मोठी व प्राचीन परंपरा आहे.संतांनी सुरू केलेली ही परंपरा आजतागायत नित्याने दरवर्षी सुरू आहे.आपल्या कुटुंबातील किमान एक व्यक्ती पंढरीला विठूरायाचे दर्शनासाठी जाण्याची प्रथा आहे.विदर्भ पंढरीचा राणा श्री संत गजानन महाराज संस्थान ची पालखी जवळपास 700 वारकर्यासह राजवैभवी थाटात पायदळ वारीने जाते.श्रींच्या पालखीचे यंदाचे 55 वे वर्ष असून वारकऱ्यांची नावे नोंदणी सुरू आहे.श्री गजानन महाराज संस्थान कडून श्री च्या पायी वारीच्या दृष्टीने तयारी सुरू आहे.
- Advertisement -
- Advertisement -
15 ते 20 जुलै पर्यंत मुक्काम
13 जून रोजी सकाळी 7 वा श्री च्या पालखीचे श्री गजानन महाराज संस्थान मधून श्री च्या रजत मुखवट्याचे विधिवत पुजन करून प्रस्थान होणार आहे. तब्बल महिनाभरानंतर ही पायदळ वारी 15 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे.पंढरपूर येथे श्री संस्थेच्या शाखेत पालखी 15 ते 20 जुलै पर्यंत मुक्काम राहणार आहे.
पालखी मार्गाची पाहणी
श्रींच्या सेवाधारी पथकाकडून शेगाव ते अकोला मार्गे श्री क्षेत्र पंढरपूर या पायदळ पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली.दरम्यान पालखीच्या पायदळ वारीच्या मार्गातील पालखी मुक्काम व पुढच्या प्रवासाबाबतचे वेळापत्रक ही संबंधित गावकऱ्यांना देण्यात आले. श्री च्या पालखीतील वारकर्याचा गणवेश, पताकाधारी,टाळकरी यासह व्यवस्थेतील सेवाधारी तसेच पालखीसोबत वैद्यकीय पथक,पाण्याची व्यवस्था यासह इतरही सुविधा संस्थान कडून उपलब्ध करून देण्यात येतात.श्री च्या पालखीतील शिस्त सर्वाना भावते.
700 वारकरी सोबत
Gajanan Maharaj Palkhi : श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा सोबत भगव्या पताका खांद्यावर घेतलेले श्वेतवस्त्रधारी 700 वारकरी यात 250 पताका धारी, 250 टाळकरी ,200 सेेवेकरी, दोन रुग्णवाहिका, तीन माल ट्रक , तीन अश्व, एक प्रवासी बस, शिस्तबद्ध रांग असते.