MUMBAI |
पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांचे सेवेत आली आहे.(Mumbai Bhuyari Metro) आज सकाळी ११ वा. मेट्रो ३ अर्थात अॅक्वा मार्गाची सेवा सुरू झाली. मेट्रो ३ ची सेवा मंगळवारपासून सकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे.
आरे ते बीकेसी हा प्रवास रस्त्यावरुन बेस्टच्या बसने एक ते दीड तासात करता येतो. या प्रवासात अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. याउलट आरे कारशेड ते बीकेसी हा प्रवास मेट्रोतून अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होणार आहे.
मेट्रो ३ या मार्गिकेची एकूण लांबी ३३.५० किमी. आहे. तर आरे कारशेड ते बीकेसी या पहिल्या टप्प्याच्या मार्गिकेची लांबी १२.६९ किमी. आहे. या टप्प्यात दहा स्थानके आहेत. ताशी ९५ किमी. वेगाने ही मेट्रो धावणार आहे. आरे ते बीकेसी हा प्रवास मेट्रो ३ मुळे अवघ्या बावीस मिनिटांत पूर्ण होणार आहे.
- Advertisement -
- Advertisement -