Khamgoan
खामगाव : स्व. संजय ठाकरे पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सावजी ले आऊट सुटाळा खु. येथील स्वल्पविराम निवास स्थानाजवळ श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा १५ ते २२ आक्टोंबर या कालावधीत आयोजित केला आहे. जागृती आश्रम शेलोडी येथील प.पू. शंकर महाराज हे कथावाचन करणार आहेत. भागवत कथेची वेळ सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत राहील. स्व. संजय ठाकरे पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी श्रीमद भागवत कथा सोहळा आयोजित केला आहे. तरी भाविक भक्तांनी या कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहम स्वप्निल ठाकरे पाटील, ठाकरे परिवार आणि जागृती आश्रम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.