SONALA
सोनाळा : दसऱ्यापासून सातपुडयातील पिंगळी येथील शेतकऱ्यांनी शेत बांधावरच बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे . माजी जि .प सदस्य डॉ . वासुदेवराव गावंडे यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी एकवटले आहेत . मंजूर झालेल्या डीपी ला निधीचा खोडा असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत . त्यामुळे तिसऱ्या दिवशी हे बेमुदत आंदोलन सुरुच आहे . प्रशासनाकडून हे आंदोलन बेदखल केल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत . त्यामुळे १४ आक्टोंबर रोजी ढोल वाजवून शेतकऱ्याने मुंडण केले व वीज कंपनीचा निषेध् केला . मुंडण करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव बाळकृष्ण डोमाळे असे आहे .तर शेतकरी मोहन डोमाळे यांनी ढोल वाजवून कुंभकर्णी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला . यावेळी पिंगळी शिवारातील असंख्य शेतकरी उपस्थित होते
सातपुडा पर्वताच्या कुशीत दुर्गम आदिवासी गाव पिंगळी वसलेले आहे.हे गाव सोनाळा वीज उपकेंद्रात समाविष्ठ आहे . येथील आदिवासी शेतकरी सद्या मेटाकुटीला आले आहेत . पिंगळी शिवारातील खारोडे डीपी लगत २ शेती पंप डीपी ला मंजूरात मिळाली आहे .त्यातील एका डीपी साठी डीपीडीसीने निधी दिला .मात्र दुसऱ्या डीपी च्या निधी साठी वीज कंपनी टोलवाटोलवी करित आहेत . शेतकऱ्यां करिता डीपीडीसीत निधी नाही . त्यामुळे माजी जि .प सदस्य डॉ वासुदेवराव गावंडे यांच्या नेतृत्वात शेतकरी अमोल महारनर , रामेश्वर गावंडे , श्रीकृष्ण डोमाळे , जब्बार सुरत्ने , मोहन डोमाळे , मोहबत पाले , सोनाजी निमकर्डे इत्यादी सहभागी झाले आहेत .दसऱ्याचे दिवशी शनिवार १२ आक्टोंबरला मंजूर २ शेती पंप डीपी साठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे .जिल्हाधिकारी यांचे कडे बोट दाखवत वीज कंपनीचे अधिकारी मंजूर डीपी साठी हातवर करून
डीपी चे घोंगडे फेकले आहे .यामुळे आदिवासी संताप व्यक्त करित आहेत .सातपुड्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी संत्रा बागा लावल्या आहेत .मात्र अनियमित व कमी दाबाचा विजपुरवठा होतो . .तासनतास वीज वाहिणीवर बिघाड झालेला असतो . त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत . प्रत्यक्ष डीपीचे काम सुरु होई पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे .
SONALA : डीपीसाठी शेतबांधावरच ठिय्या: शेतकऱ्याने केले मुंडण
Leave a comment