Ravikant Tupkar
अकोला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे आक्रमक आंदोलनासाठी ओळखले जातात. शनिवारी त्यांनी चक्क आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने आत्मदहन करण्यापूर्वी पोलिसांनी त्याना ताब्यात घेतले. दरम्यान आ तुपकरांना अटक केल्यानंतर त्यांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली होती. पोलीस कस्टडीत त्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरुच होते, वैद्यकीय तपासणी आणि उपचारास त्यांनी नकार दिला होता. दरम्यान आता त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. आता कारागृहातही आपण अन्नत्याग सुरुच ठेवणार असल्याचे तुपकरांनी सांगितले आहे.रविकांत तुपकरांसह २५ जण सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना अकोला कारागृहात ठेवण्यात आलेले आहे. आता या आंदोलनात सरकार काय भुमीका घेते हे पाहावे, लागणार आहे.
प्रशासनाविरोधात शेतकऱ्यांचा रोष
कापूस, सोयाबीन पिकाला भाव नाही, परिणामी शेतकरी संकटात सापडलेला आहे. पीक विम्याच्या प्रशांवर गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी तक्रारी करत असताना सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांच्या याच महत्वाच्या मागण्या घेऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर हे आंदोलन करत आहेत. आता हे आंदोलन आरपारची लढाई म्हणून केले जातआहे. शनिवारी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर येताच तुपकर यांनी अंगावर रॉकेल व डिझल घेतले तेव्हापासून हे आंदोलन चिघडलेले आहे. शेतकरी आंदोलनासमोर न जाता प्रशासन दंडुके पुढे करत आहेत. परिमाणी शेतकरी रोष व्यक्त करत आहेत.
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
शनिवारी मध्यरात्री उशीरापर्यंत या सर्वांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना चिखली येथे कस्टडी रुममध्ये ठेवण्यात आले. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात या सर्वांना बुलढाणा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. तुपकरांसह कार्यकर्त्यांना न्यायालयात आणण्यापूर्वीच न्यायालयाच्या प्रवेशद्वारासह परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. कुणालाच आत जाऊ देत नव्हते, अगदी वकिलांनाही अडविण्यात आले, पोलिसांनी आपली ताठर आणि मुजोरीची भूमिका कायम ठेवत चक्क लोकप्रतिनिधींनाही तुपकरांना भेटण्यास पोलीस ठाण्यात येण्यास मज्जाव केला होता आंदोलन कव्हर करणाऱ्या पत्रकार बांधवाना सुद्धा धक्काबुक्की झाली असल्याने पत्रकारांनी सुद्धा पोलिसांच्या विरोधात ठिकठिकाणी निवेदन देऊन निषेध नोंदविला आहे.दरम्यान न्यायालयाने तुपकरांसह सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बुलढाणा येथून तुपकरांसह २५ जणांची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे
अट्टल गुन्हेगारांसारखी वागणूक
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या या कारकर्त्यांना पोलिसांनी पोलिसांनी सराईत गुन्हेगार असल्यासारखी वागणूक दिली. तात्यांचे मोाबईल हिसकावून घेतले, कुणाशी बोलण्यास मज्जाव,कुणाला भेटु न देणे अशी वर्तणूक देण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी तुपकरांसह २५ जणांवर भादंवि ३५३, ३०९, १७१, १४७, १४८, १४९, ३३६, १०९, १८८ सह कलम ३ प्रॉर्पट्री डॅमेज ॲक्ट, सहकलम १३५ मुपोका. नुसार गुन्हे दाखल केले होते. बुलढाणा कारागृहात जागा नसल्याचे कारण सांगत या सर्वांची अकोला कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांनी आकस बुद्धीने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचे काम केले असून हेतुपुरस्करपणे अट्टल गुन्हेगारांसारखी वागणूक दिली असल्याचा आरोप तुपकरांनी केला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही अन्नत्याग तोवर आंदोलन सुरूच राहील, असेही तुपकर यांनी सांगितले.