खामगाव ( प्रतिनिधी ) : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी या मागणी करिता राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारने कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सकारात्मक विचार करावा. कर्मचारी बाधंवांच्या संपाची दखल घेऊन संपाची दखल घेवून जुनी पेंशन लागू योजना करावी , अशी मागणी जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंग चौहान यांनी केली आहे.
महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रुजु झालेल्या सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांची बंद केलेली जुनी पेंशन सुरु करणेबाबत महाराष्ट्र राज्य शासकीय व निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर समितीच्या वतीने १४ मार्चपासून सुरु असलेल्या बेमुदत संप दिवसेंदिवस संपाची तीव्रता वाढत असून राज्य शासनाने तात्काळ या संपाची दखल घेऊन सर्व कर्मचारी बांधवांना द्यावा, या मागणीसाठी 17 मार्च रोजी खामगाव शहरांमधून मोठ्या प्रमाणात कर्मचारी बांधवांच्या वतीने मोटर सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये तेजेंद्रसिंह चौहान अध्यक्ष बुलढाणा जिल्हा काँग्रेस सेवादल हे सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला.
यावेळी तेजेंद्रसिंह चौहान पुढे म्हणाले की , काँग्रेस पक्ष हा सर्व कर्मचारी वर्गाच्या शेतकरी शेतमजुरांच्या पाठीशी उभा असून जोपर्यंत शासन न्याय देणार नाही तोपर्यंत वेळोवेळी आंदोलनामध्ये सहभागी होऊन सरकारचा विरोधात आंदोलन करत राहू तात्काळ राज्य शासनाने काँग्रेस शासित राज्यात जशी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे तेथील राज्याचे अनुकरण करून महाराष्ट्र राज्यामध्ये मुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावी या भव्य मोटरसायकल रॅलीमध्ये काँग्रेस सेवादलचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला या वेळी अमित तावडे अध्यक्ष बुलढाणा जिल्हा काँग्रेस सेवादल सोपान भाऊ पाटील तालुका अध्यक्ष सेवादल साहिल देशमुख तालुका अध्यक्ष एनएसयुआय, शेख सत्तार, छोटू पाटील, सौरभ रिछारीया, शहर अध्यक्ष एनएसयूआय यांच्यासह अनेकांनी आपली उपस्थिती दर्शविली .