Agro News : शेतीच्या मशागतीचा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी विविध कल्पना आणि युक्त्या लढवत असतात अशाच पद्धतीने एका शेतकऱ्याने जुगाड करत कोळपणीचा खर्च कमी केला आहे या शेतकऱ्याने केलेल्या देशी जुगाड चा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
यावर्षी पाऊस उशिरा आल्याने करण्यास सुद्धा लांबल्या होत्या जुलैमध्ये प्रेरणा आटोपल्यानंतर आता शेतकरी शेतमशागतीच्या कामांना लागले आहेत दरम्यान शेतीच्या मशागतीचा खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून नवनवीन जुगाड केले जात आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्याने अशा प्रकारच्या जुगाडचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात हुनगुंदा येथील शेतकरी जीवन पाटील यांनी केलेल्या देशी जुगाडचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असेल अनेक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने जुगाड करून शेतीची मशागत सुरू केली आहे या शेतकऱ्यांनी नेमके काय केले हे आपण जाणून घेऊया.
हुनगुंदा जीवन पाटील या शेतकऱ्याने ट्रॅक्टरला कोळपणी (डवरणी) यंत्र जोडलं आहे. त्यात 6 डवरे जोडले आहेत. त्यामुळे एका वेळी दुप्पट शेतीची कोळपणी केली जात आहे. विशेष म्हणजे यात इंधनाची सुद्धा बचत होत असून शेतकऱ्यांचा वेळ सुद्धा वाचत आहे. एक लिटर डिझेलच्या खर्चात दोन दोन एकरातील शेतीची कोळपणी होत असल्याचे शेतकरी जीवन पाटील यांनी सांगितले. कष्टाने श्रमाची बचत करणारे हे जुगाड शेतकऱ्यांच्या पसंतीस पडले असून अनेकांनी अशा पद्धतीने ओळखणे सुरू केली आहे.