Amol Andhare
खामगाव ः राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस हे आज खामगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी येथील न्यायालयाच्या ईमारतीचा भुमिपूजन सोहळा त्यांच्याहस्ते संपन्न झाला. दरम्यान बार असोसिएशनच्या वतीने ना.फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विश्व हिंदु परिषदचे प्रांतमंत्री तथा ॲड.अमोल अंधारे (Amol Andhare)यांनी ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच विविध विषयांवर चर्चा देखील केली.
काही दिवसातच आचार संहिता लागू होवून विधानसभा निवडणूका जाहीर होतील. दरम्यान खामगाव विधानसभा मतदार संघात भाजपकडून उमेदवार म्हणून ॲड.अमोल अंधारे यांचे नाव सद्या चर्चेत असून यापुर्वी सुध्दा अमोल अंधारे यांनी ना.नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. तर आजच्या कार्यक्रमातील स्वागतचा फोटो उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर टाकला आहेत.
हा फोटो सद्या खामगाव शहरात व्हायरल होत आहे. तसेच वेगवेगळ्या चर्चा देखील होत आहे. अमोल अंधारे विधानसभेची तयारी तर करत नाहीत ना असे सुद्धा बोलले जात आहे.