Apmc Buldhana
बुलढाणा जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांसाठी गुरुवारपासून खऱ्या अर्थाने रणसंग्राम सुरू झाला आहे. २० एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ११७९ उमेदवारांनी न लढताच आपल्या तलवारी म्यान करत मैदानातून माघार घेतली. या सर्व समित्यांच्या २८० संचालकांच्या जागांसाठी आता ४४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
मध्यंतरी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने काही ठिकाणी काही उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले होते. तर काहींचे बाद ठरवण्यात आले. सुनावणीदरम्यान काही अर्ज मंजूर झाले. बाजार समिती निवडणुकीसाठी १६२१ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. २० एप्रिलला नामांकन मागे घेण्याच्या दिवशी ११७९ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे परत घेतली. आता निवडणूक मैदानात ४४२ उमेदवार उरले आहेत. आता खऱ्या अर्थाने निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.
बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीकरिता १६८ अर्ज प्राप्त झाले होते. अर्ज माघारीनंतर सोसायटी मतदारसंघात २३, ग्रामपंचायत १०, व्यापारी ३ व हमाल मापारी मतदारसंघात ३ असे ३९ उमेदवार रिंगणात आहेत. मलकापूरमध्ये १५५ पैकी ४६ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
सोसायटी मतदारसंघ २६, ग्रा॒मप॑चायत १०, व्यापारी ४, हमाल ६ असे उमेदवार रिंगणात आहेत. जळगाव जामोदमध्ये १३० पैकी ४० उमेदवार रिंगणात आहेत. यात सोसायटी २२ ग्रामपंचायत १२, व्यापारी ४, हमाल २ असे उमेदवार आहेत. देऊळगाव राजात २११ मधून उमेदवारांनी माघार घेतल्याने ४२ उमेदवार राहिले आहेत. यामध्ये सोसायटी २४, ग्रामपंचायत ११, व्यापारी २ व हमाल मतदारसंघात ५ उमेदवारांचा समावेश आहे. मेहकरमधून १५७ अर्ज आले होते. माघारीनंतर सोसायटीत २४, ग्रामपंचायत ९, व्यापारी ९ व हमाल ३ असे ४५ उमेदवार रिंगणात आहेत. लोणारमधून २०५ पैकी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. यात सोसायटी २६, ग्रामपंचायत ११, व्यापारी ४, हमाल ४ असे उमेदवार आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
चिखलीत २१७ अर्जांमधून ५० उमेदवार उरले आहेत. यामध्ये सोसायटी २७, ग्रामपंचायत १३, व्यापारी ६ व हमाल ४ उमेदवार आहेत. खामगावमध्ये १६४ पैकी ५३ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. यामध्ये ३१ सोसायटी, १२ ग्रामपंचायत, ५ व्यापारी व ५ हमाल मतदारसंघातील उमेदवार आहेत. नांदुऱ्यात २७ सोसायटी, १२ ग्रामपंचायत, ५ व्यापारी, २ हमाल असे ४६ उमेदवार उरले आहेत. त्याचप्रमाणे शेगावमध्ये १०६ उमेदवार होते. यापैकी ३८ उमेदवार रिंगणात असून, सोसायटी मतदारसंघात २३, ग्रामपंचायत ९, व्यापारी ४ व हमाल मतदारसंघात २ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.