Bhakra Nangal Train :भारतीय रेल्वेचे जाळे देशभर विणले गेले असून चांगली आणि कमी खर्चात प्रवाशांना सेवा देणारी रेल्वे लोकप्रिय आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी लोक रेल्वे प्रवासाला पसंती देतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की भारतीय रेल्वे एका स्थानकावर प्रवाशांना मोफत सुविधा अर्थात प्रवासाची सोय करून देत आहे आपण या बातमीत हीच माहिती जाणून घेणार आहोत.
भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी रेल्वे सेवा म्हणून ओळखली जाते. देशात कोठेही कमी खर्चात जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर रेल्वे हा एक उत्तम पर्याय आहे. एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भारतीय रेल्वे गेल्या 73 वर्षांपासून 25 गावातील लोकांना मोफत सेवा देत आहे. विना तिकीट असताना सुद्धा प्रवास करताना कोणताही गुन्हा या ठिकाणी मानला जात नाही लोक मोफत प्रवासाचा आनंद घेत असतात.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोफत प्रवास रेल्वे कोठे आहे खरंच अशी सुविधा रेल्वेने केली आहे का, तर होय रेल्वे एका ठिकाणी अशी सुविधा प्रवाशांना देत आहे आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगत आहोत की ही रेल्वे सेवा हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्याच्या सीमेवर सुरू आहे.रेल्वेत प्रवास करताना विना तिकीट असलो तर आपल्याला टीसी कडून फाईन केला जातो किंवा गुन्हा दाखल होऊ शकतो हे सर्वश्रूत आहे मात्र उपरोक्त ठिकाणी प्रवास करताना एक रुपया सुद्धा खर्च न करता तुम्हाला रेल्वे प्रवास करता येतो. जर आपण भाकरा नांगल धरण पाहण्यासाठी जात असाल तर ही ट्रेन सुविधा मोफत उपलब्ध आहे ही ट्रेन नांगल ते भाकरा पर्यंत चालवली जाते या प्रवासादरम्यान तुम्हाला रेल्वेचे तिकीट खरेदी करण्याची गरज पडत नाही
एकीकडे सर्वत्र रेल्वे टिकीट आवश्यक असताना या प्रवासादरम्यान विनामूल्य प्रवास कसा करता येतो असा प्रश्न साहजिकच आता आपल्याला पडला असेल तर त्याचे उत्तर असे आहे की भाकरा नांगल धरण पाहण्यासाठी ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे. इथे आलेल्या पर्यटकांना भाकरा नांगल धरणावर या ट्रेन मधून मोफत प्रवास करता येतो. भाकरा नांगल धरण देशातील सर्वात मोठे धरण असून ते कसे बांधण्यात आले, त्याच्या निर्मितीचा इतिहास काय आहे आणि धरणाची निर्मिती करताना किती कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला या सर्व गोष्टींची माहिती नवीन पिढीला झाली पाहिजे हा या ट्रेन चालवण्यामागचा उद्देश आहे. ही ट्रेन भाकडा प्रबंधन बोर्ड बीबीएमबी द्वारा संचलित आहे.
- Advertisement -
- Advertisement -
भाकरा नांगल धरणावर जाणारा रेल्वे मार्ग बनविण्यासाठी मोठे मोठे पहाड कोरण्यात आले. ही रेल्वे 1947 मध्ये सुरू झाली होती. परिसरातील 25 गावाचे लोक, पर्यटक तसेच विद्यार्थी या रेल्वेचा प्रवासाचा फायदा घेतात. ही ट्रेन रोज भाकरा नांगल धरण डॅम पर्यंत जाते. दिवसातून रेल्वेच्या दोन फेऱ्या होतात उल्लेखनीय आहे की ट्रेनचे सर्व कोच लाकडापासून बनवले गेले आहेत. ही ट्रेन नांगलहून सकाळी ७:०५ वाजता आणि भाकरा हूनदुपारी ३:०५ वाजता सुटते. आणि भाकराहून परतीचा प्रवास सकाळी 8:20 आणि संध्याकाळी 4:20 वाजता आहे. भाकरा ते नांगल हे अंतर कापण्यासाठी Bhakra Nangal Train ला अंदाजे 1 तास लागतो.