Buldana Loksabha 2024
खामगाव – बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भुमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांच्या खामगाव प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खा.प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 9 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर थांटात संपन्न झाले. यावेळी माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.संजय कुटे, खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम पक्षाचे जेष्ठ रामदादा मोहीते, दर्शनसिंह ठाकूर व जेष्ठांच्या हस्ते फित कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी आ.ॲड.आकाश फुंडकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वात देशाची बलशाली भारत बनण्याकडे वाटचाल सुरू आहे. त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय, देशाचा शाश्वत विकास यामुळे नरेंद्र मोदी यांची विजयाची घौडदौड कोणीही थांबवू शकत नाही. या निवडणुकीत खा.प्रतापराव जाधव यांना मागील निवडणुकीपेक्षा अधिकचा लीड मिळवून देवू असे सांगत खा.जाधव विदर्भातून रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येतील असा विश्वास आ.फुंडकर यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान आ.संजय कुटे यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे असे सांगितले. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र देशमुख यांनी महायुतीला आता राष्ट्रवादीची साथ असून संपुर्ण ताकदिनिशी खा.जाधव यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.
महायुतीच्या पाठीशी रहा – खा.जाधव
विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी वाटचाल करणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र यांना पुन्हा एकदा आपल्याला पंतप्रधान बनवायचे आहे. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीयपातळीवर देशाला सन्मान मिळवून दिला आहे. देशातील शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील प्रत्येक गावात विकासाची कामे त्यांच्या काळात झाली. प्रत्येक घटकातील लोकांसाठी त्यांनी योजना आणल्या, नव्हे तर त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम केले. यामुळे पंतप्रधान मोदींवरील जनतेचा विश्वास आता 100 पटीने वाढला आहे. केंद्र व राज्यातील सरकारने आजपर्यंत कधी झाली नसतील एवढी विकास कामे केली आहेत. यामुळे नरेंद्र मोदी यांनी दिलेला 400 पार चा नारा आपल्याला पुर्ण करायचा असून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी व बुलडाणा लोकसभा मतदार संघात महायुतीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज रहा असे आवाहन यावेळी खा.प्रतापराव जाधव यांनी केले.