Call girls in Nagpur
नागपूरः फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, हाइक अशा विविध सोशल साइट्सवरील ग्रुप, टिंडर अॅपवर सध्या सर्वाधिक तरुण, तरुणी डेटिंगसाठी पुढाकार घेतात. या ऑनलाइन अॅपद्वारे सध्या उपराजधानीत हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा नवा ट्रेंड सुरू आहे. शहरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये दलालांच्या माध्यमातून हे सेक्स रॅकेट सुरू आहे. यात सिने इंडस्ट्रीसह मॉडल, उच्चशिक्षित, विदेशी तरुणींचा समावेश आहे. याद्वारे हव्या त्याठिकाणी मुली पुरविण्यात येतात. या अॅपच्या माध्यमातून श्रीमंत घरातील तरुणांना हेरल्या जाते. यामध्ये कुठे सेक्स रॅकेट तर कुठे फसवणुकीचे प्रकार होत असून जोडीदाराच्या प्रतीक्षेत अल्पवयीन मुले, तरुणांपासून वृद्धांवरही पैसे गमाविण्याची वेळ आली आहे.
काळाबरोबर वेश्याव्यवसायाचा ट्रेंडही बदलत चालला आहे. मॉडेलिंगच्या नावाखाली नवी दिल्ली, मुंबई, पंजाब, गोवा, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून तरुणी फोटोशूट करण्याच्या बहाण्याने नागपुरात पोहोचत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून नागपूर शहरात मॉडेलिंग क्षेत्राबरोबरच टीव्ही क्षेत्रातूनही तरुणी आल्याची चर्चा आहे. कुणाला संशय येऊ नये म्हणून दलालांच्या माध्यमातून तरुणी नागपूरच्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये राहून वेश्या व्यवसाय करीत आहेत. शहरातील धरमपेठ, सीताबर्डी, माउंट रोड, सदर, जनता चौक, विमानतळसंकुल परिसरात असलेल्या अनेक बड्या हॉटेल्समध्ये हा धंदा सुरू आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामवर असलेल्या डेटिंग खात्यावर तरुणींशी संवाद साधण्यासाठी आधी पैसे मोजावे लागतात. गप्पा मारण्यापासून अश्लील चॅटिंग, व्हिडीओ कॉल तसेच भेटीसाठी विविध रेट कार्ड ठरलेले आहेत. संवाद साधण्यासाठी एखाद्या खात्यावर पैसे भरल्यास पुढे ते खातेच ब्लॉक केल्या जाते. अशाप्रकारे फसवणूक करण्याचे प्रकार अनेक घटनांवरून समोर आले आहे. कित्येक वर्षांपासून सुरू झालेल्या टिंडर डेटिंग अॅपमध्ये दिवसाला लाखो फोटो स्वाइप केले जातात. लाखोंच्या घरात यांचे युझर्स आहेत. या अॅपचा १६ ते २६ वयोगटांतील ३८ टक्के मुले, मुली, २५ ते ३४ वयोगटांतील ४५ टक्के तर ५५ ते ६४ वयोगटांतील १३ टक्के वापर करत असल्याची माहिती आहे.
याद्वारे लोकेशननुसार जोडीदाराचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे श्रीमंत कुटुंबातील तरुणांना आधी जाळ्यात अडकवून नंतर शहरातील मोठमोठ्या हॉटेल्समध्ये बोलावण्यात येते. यासाठी वेश्याव्यवसायात (Call girls in Nagpur) सक्रिय असलेल्या या मुलींसाठी हॉटेलमालकांकडून ३० ते ४० टक्के कमिशन आधीच निश्चित केले जाते. हॉटेलमध्ये महागडी रूम बुक केल्यानंतर दारू आणि जेवणाची ऑर्डर दिली जाते आणि पहिल्या भेटीनंतर महागड्या भेटवस्तूंची मुलींकडून मागणीही केली जाते. अशा अॅपमुळे वेश्याव्यवसायाचा ‘हायप्रोफाइल’ मार्ग मोकळा होत असताना दिसत आहे. तर दुसरीकडे तरुण-तरुणींसह अनेक जण या फसवणुकीच्या जाळ्यात अडकत आहेत. केवळ बदनामीच्या भीतीने ते पुढे येत नसल्याचे समोर येत आहे. तक्रारच नसेल तर कारवाई कशी करणार ? शिवाय काही ठिकाणी कमी रकमेची फसवणूक झाल्याने पोलीस ठाण्याच्या पायऱ्या नको म्हणत युझर्स गप्प बसतात. त्यामुळे ही प्रकरणे पडद्याआड राहतात. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे हा व्यवसाय फोफावू लागला असून याला आळा घालण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
- Advertisement -
- Advertisement -
ऑनलाइन डेटिंग करताना किंवा कुठल्याही अॅप, सोशल नेटवर्किंग साइटवर स्वतःची माहिती शेअर करताना काळजी घेणे गरजेचे आहे. आपण कुठल्या चुकीच्या व्यक्तीच्या जाळ्यात तर अडकत नाही ना? याचे भान ठेवा. फसवणूक झाल्यास पोलिसांशी संपर्क साधा. -विजय भिसे, पोलीस निरीक्षक (सायबर क्राइम)