मलकापूर(सतीश दांडगे ) : येथील शास्त्रीनगरात chain snatching ची घटना घडली आहे. इव्हीनींग वॉक करणाऱ्या विवाहित महिलेची ३० हजारांची सोनसाखळी chain snatchingशुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी पळवली.हि घटना सिसीटीव्हीत कैद झाली असून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, येथील बद्री कॉम्प्लेक्स मधील रहिवासी योगीता रंजीतकुमार रेदासणी वय ४७ ह्या त्यांच्या मैत्रिणी राणी गोयंका व स्मिता अग्रवाल यांच्या समवेत शास्त्री नगरातील श्री गजानन महाराज मंदिर रस्त्यावर इव्हीनींग वॉक करीत होत्या.शुक्रवारी रात्री १०.२० च्या सुमारास पाठीमागून दुचाकीवरून दोघे जण अचानक आले.त्यांनी योगीता रेदासणी यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबडली.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : एकच हलकल्लोळ, किंचाळ्या आणि काही क्षणातच २६ जणांचा कोळसा
दोन महिन्यांपूर्वी त्यांनी १८ ग्रॅम ची सोनसाखळी वापरण्यासाठी बनवून घेतली होती.या घटनेत महिलांनी चोर चोर असा आरडाओरडा केला.मात्र तोवर सोनसाखळीतील ६ ग्रॅम चा सुमारे ३० हजार रुपये किंमतीचा सोनसाखळीचा भाग पळवून नेला.
या घटनेची माहिती कळताच असंख्य नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली.मात्र तोवर चोर पसार झाले होते.हा प्रकार श्री गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील ऍग्रो सर्विसेस सेंटर नजीक सिसीटीव्हीत कैद झाला आहे.शहर पोलिसांनी योगीता रेदासणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
- Advertisement -
- Advertisement -
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची अपघातस्थळी पाहणी; पाहणीनंतर दिले हे आदेश