CNG kit in scooter : पेट्रोल महाग झाले असल्याने लोक आता त्याला पर्याय शोधत असतात. आता अनेक शहरांमध्ये सीएनजीवर चालणाऱ्या स्कूटरदिसून येतात. . पेट्रोलच्या तुलनेत या स्कूटर चालवायला किफायतशीर आहेत. आता तुम्ही विचार करत असाल की जेव्हा कोणत्याही कंपनीने सीएनजी स्कूटर लॉन्च केल्या नसताना नाहीत मार्केटमध्ये कशा उपलब्ध आहेत. वास्तविक, स्कूटरमध्ये सीएनजी किट बसवून मिळते. त्या नंतर पेट्रोल आणि सीएनजी अश्या दोन्ही इंधनावर तुम्ही गाडी चालवू शकता या बातमीत आपण सीएनजी किट बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत…
खर्च फक्त 70 पैसे प्रति किलोमीटर
CNG kit in scooter : पेट्रोल आणि डिझलच्या वाढत्या किमती पाहता लोक स्वस्त इंधन म्हणून यापूर्वी चारचाकी वाहनात सीएनजी किट बसवित होते. आता दुचाकी वाहनांना सुद्धा ही किट बसविण्यात येई. त्यासाठी विविध कंपन्यांनी अश्या किट बाजरात आणल्या आहेत. आपल्या गावात सीएनजी पंप असेल तर आपण सुद्धा आपल्या स्कुटरमध्ये सीएनजी किट बसवू शकता. पेट्रोलचे दर प्रतिलिटर 110 रुपये आहेत. तर, Activa, Jupiter, Maestro सारख्या सर्व स्कूटरचे मायलेज सुमारे 40 ते 45 km/ आहे. म्हणजेच त्यांना चालवणे खूप महाग होते. याच कारणामुळे आता अनेक कंपन्या स्कूटरसाठी सीएनजी किट घेऊन आल्या आहेत. या किट्सच्या मदतीने स्कूटर चालवण्याचा खर्च फक्त 70 पैसे प्रति किलोमीटर इतका होणार आहे.
स्कूटरमध्ये सीएनजी किट बसवा
CNG kit in scooter : तुमच्याकडे Honda Activa, TVS Jupiter, Hero Maestro, Suzuki Access किंवा इतर कोणतीही स्कूटर आहे. त्यांचे मायलेज वाढवण्यासाठी सीएनजी किट बसवावे लागणार आहेत. दिल्लीस्थित CNG किट निर्माता कंपनी Lovato या स्कूटरमध्ये हे किट बसवू शकते. त्याची किंमत सुमारे 18 हजार रुपये आहे. सीएनजी आणि पेट्रोलच्या किमतीत 40 रुपयांपर्यंतचा फरक असल्याने तुम्ही हा खर्च 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत वसूल कराल असा कंपनीचा दावा आहे.
पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही सुविधा
CNG kit in scooter : स्कूटरमध्ये सीएनजी किट बसवायला ४ तास लागतात, त्यानंतर गाडी सीएनजी आणि पेट्रोलवरही चालवता येते. यासाठी कंपनी CNG मोडवरून पेट्रोल मोडवर स्विच करणारा स्विच बसवते. कंपनी दोन सिलिंडर समोर ठेवते जे काळ्या प्लास्टिकने झाकलेले असतात. त्याच वेळी, ते ऑपरेट करणारे मशीन सीटच्या खालच्या भागात बसते. म्हणजेच ऍक्टिव्हा सीएनजी आणि पेट्रोल या दोन्हीवर चालवता येते. Activa वर CNG शी संबंधित काही ग्राफिक्स देखील आहेत. आता स्कूटरमध्ये सीएनजी किट बसवण्यासाठी अनेक कंपन्या बाजारात आल्या आहेत. सीएनजी किटवर वॉरंटी देखील देखील दिली जाते. किटची किंमत तुमच्या शहरानुसार बदलू शकते.
- Advertisement -
- Advertisement -
सीएनजी किट बसवण्याचे काही तोटे
CNG kit in scooter : सीएनजी किट बसवण्याचेही काही तोटे आहेत. सर्वप्रथम, या किटमध्ये बसवलेले सिलिंडर केवळ 1.2 किलो सीएनजी साठवते. अशा परिस्थितीत जेव्हा 120 ते 130 किमी नंतर तुम्हाला पुन्हा सीएनजीची गरज भासेल. तर सीएनजी स्टेशन सहजासहजी मिळत नाहीत. ते तुमच्या स्थानापासून 10-15 किंवा अधिक किलोमीटर दूर असू शकते. सीएनजीमुळे स्कूटरचे मायलेज वाढले तरी चालेल, पण ते पिकअप कमी होतो . अशा स्थितीत चढाईच्या मार्गावर वाहनाचे इंजिन वर लोड सुद्धा येऊ शकतो. याबाबत जाणकार व्यक्तीकडून माहिती घेता येईल.
हे ही वाचा .. ३० हजारांची नोकरी करणाऱ्या अभियंता महिलेकडे कोट्यवधीचे घबाड