crime alert
■ गुन्हेगार रामदासपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी
■ पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची कारवाई
अकोला : शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची मोही अकोला पोलिस दलाने हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी रामदासपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील दोन गुन्हेगारी टोळीला पुढील दोन वर्षांकरिता हद्दपार करण्याची कारवाई केली आहे.
अकोला जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर आळा बसावा याकरिता पोलिस स्टेशन रामदासपेठचे पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांनी सदर पोलिस स्टेशन (crime alert) हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार यश उर्फ प्रिन्स रवींद्र केंगावकर (२४) आणि धनराज मोहन थंडवार (२३) दोघेही रा. देशमुखफैल अकोला या गुन्हेगारांवरील गुन्हयांची मालिका पाहता त्यांच्या विरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलिस अधिनियमान्वये अकोला जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने २० एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सदर गुन्हेगार यांना अकोला जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याची कारवाई केली असून, त्या गुन्हेगारांना अकोला जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अकोला पोलिस दलाने कंबर कसली आहे. सदर प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलित करण्यात येत असून, तसे आदेश देण्यात आले आहे. तसेच सदर गुन्हेगारांविरूध्द प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे सुरू आहे.
-संदीप घुगे,
पोलिस अधीक्षक अकोला