पुणे : पुण्यातील एका १२ वर्षीय मुलाने १ मिनिट आणि ५ सेकंदांत सुमारे ५० गणिताचे घनमूळ म्हणजे क्यूब रुट काढणारी गणिते सोडविण्याचा पराक्रम केला आहे. देवेन पाटील (Deven Patil )असे या मुलाचे नाव आहे. देवेनच्या या पराक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
देवेन पाटील हा नहे येथील सिग्नेट पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे. देवेन पाटील याने एक गणित सोडविण्यासाठी सुमारे ३ ते ५ मिनिटे लागतात तशी ५० गणिते सोडवली. एस. सी.मास या इन्स्टिट्यूटच्या सुजाता हलवाई यांनी देवेनला प्रशिक्षण देत सराव करून घेतला. नंतर त्याला रेकॉर्डसाठी पाठविले होते. सुजाता हलवाई म्हणाल्या, आजच्या विद्यार्थ्यांना देवेन पाटील हा आदर्श आहे. गणिताची भीती जाऊन गणिते सोपे असतात हे त्याने दाखवून दिले आहे. गणिताची संगत एक गंमत असे त्याला वाटते. जेएसपीएम इन्स्टिट्यूटचे ट्रस्टी ऋषीराज सावंत, शाळेच्या प्राध्यापिका अजिता परभत, शिक्षकवर्ग आणि मित्र परिवार यांनी त्याचे कौतुक केले.