बुलडाणा, : बुलढाणा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी (job opportunity) उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. 25 ते 28 मार्च 2023 या कालावधीत करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये खामगाव येथील हिंदुस्थान लिव्हर कंपनीने रोजगार मेळाव्यासाठी पदे अधिसुचित केली आहेत. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.. या मेळाव्याद्वारे हिंदुस्थान लिव्हर कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू व रोजगार इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेऊन त्यांची प्राथमिक निवड करतील. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी आणि बारावी पास पुरुष, महिला उमेदवारांनी आपले सेवासोजन कार्डचा आयडी आणि पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइनमधून ऑनलाईन अर्ज (Apply) करुन यात सहभागी व्हावे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन (Employment) कार्डचा युझर आयडी आणि पासवर्डचा उपयोग करुन आपल्या लॉगइनमधून ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतील.
पात्र उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदांकरीता अर्ज करु शकतील. दि. 25 ते 28 मार्च दरम्यानच्या मेळाव्याबाबत अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाशी प्रत्यश संपर्क साधावा, तसेच अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाच्या (07262-242342) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.