Gajanan Maharaj Palkhi News
शेगाव : Sant Shri Gajanan Maharaj यांचा पालखी सोहळा भाविकांसाठी एक मोठी आनंद पर्वणीच असते. विदर्भ पंढरी संतनगरी शेगाव येथून श्री संत गजानन महाराज पालखी सोहळा (Gajanan Maharaj palkhi) आषाढी पायी वारीसाठी २६ मे रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.यंदा पायदळ वारीचे 54 वे वर्ष आहे. पालखी सोहळ्याबाबत माहिती सविस्तर जाणून घेवूया….
असा राहील पालखी सोहळा
दरवर्षी टाळ मृदुंगाचा गजर करत ही पालखी पंढरपूरला जात असते. यावर्षी सुद्धा परंपरेनुसार जेष्ठ शुध्द सप्तमीचे दिवशी सकाळी बॅड पथक,ढोल नगारे,तुतारी ,टाळ मृदंगाचे निनादात वाजत-गाजत माउलींच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. विधिवत पूजन करून श्री च्या रजत मुखवटा पालखी विराजमान करून पालखीचे ज्ञानोबा माऊली तुकाराम, गण गण गणात बोते च्या गजरात भगव्या पताकाधारी वारकर्यासह एका गणवेषात,शिस्तीत टाळ मृदंगाचे निनादात पाऊली करत संस्थानमधून प्रस्थान करणार आहे.
- Advertisement -
- Advertisement -
श्री पालखीचे दर्शनाकरिता होणारी अलोट गर्दी लक्षात घेता आवश्यकतेनुसार श्रींचे पालखीचे परिक्रमा मार्गासाठी व मुक्कामाचे ठिकाणी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आवश्यक बदल करण्याचे संपूर्ण अधिकार हे पालखी प्रमुखाकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत पालखी प्रमुखांना हा निर्णय परिस्थितीनुरूप अंतिम राहणार आहे.
27 जून रोजी पंढरपूरला
श्री संत गजानन महाराजांची पालखी 27 जून रोजी श्री क्षेत्र पंढरपूर पोहोचणार आहे या ठिकाणी श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा पाच दिवस म्हणजेच 27 जून ते दोन जुलै पर्यंत मुक्काम राहणार आहे. तीन जुलै रोजी परतीच्या मार्गावर श्रींची पालखी निघणार आहे 23 जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर 24 जुलै रोजी सोमवारी श्रीची पालखी शेगावी पोहोचणार आहे