Hema Meena, who has a job of 30 thousand, has a wealth of crores.
भोपाळ : सरकारी नोकरी करून इतर मार्गाने वरकमाई करत अधिकारी, कर्मचारी अनेक पिढ्या पोसता येतील इतकी संपत्ती जमवितात. आपल्या देशात भ्रष्ट्राचाराने परिसीमा गाठली आहे. शासकीय सेवेतील नितीमूल्य पायदळी तुडवत सर्रास चिरीमिरी केली जाते. एकदा अधिकारी यात अडकला तर अशी प्रकरणे समोर येत असतात. भोपाळ मध्ये असेच एक प्रकरण उजेडात आले असून त्याची चर्चा संपूर्ण देशात सुरु आहे. या माहितीत आपण तीच माहिती जाणून घेणार आहोत …
भोपाळ मध्ये ३० हजारांची नोकरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका महिला अभियंत्याकडे तब्बल ७ कोटींचे घबाड आढळले आहे. यात ३० लाखांचा अत्याधुनिक टीव्ही, ६५ विदेशी कुत्रे अन् १० लक्झरी कार अशी संपत्ती अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. अवघ्या ३४ व्या वर्षी या महिला अभियंत्याने बेहिशेबी मालमत्ता जमवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भोपाळचे लोकायुक्त पोलीस अधीक्षक मनू व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात पोलीस गृहनिर्माण महामंडळात (एमपीपीएचसी) करार तत्त्वावर कार्यरत ३४ वर्षीय अविवाहित अभियंता हेमा मीनाच्या भोपाळ स्थित बिलखिरिया भागातील फार्म हाऊससहित तीन ठिकाणी मध्यरात्री १ वाजता छापे टाकण्यात आले. १० हजार चौरस फुटांहून व्यापक क्षेत्रात उभारलेल्या फार्म हाऊसमध्ये विविध विदेशी जातींचे ६५ कुत्रे, ३० जनावरे व काही गीर जातीच्या गायी आढळल्या. याशिवाय एक एसयूव्ही व ७ ते ८ लक्झरी कार आणि ३० लाखांचा टीव्ही सेट हाती लागला. १० लाखांचे सोने, ७७ हजारांची रोकड तसेच राजधानी भोपाळ, रायसेन व विदिशा जिल्ह्यातील जमिनीसंदर्भातील संपत्तीचे दस्तावेज अधिकाऱ्यांना मिळाला. हेमा मीनाकडील अवैध कमाई ही तिच्या ज्ञात स्रोतांच्या २५० टक्के अधिक असल्याचा दावा व्यास यांनी केला.
- Advertisement -
- Advertisement -
हेमा मीनाला ३० हजार रुपये मासिक वेतन मिळत होते. ती मागील १० वर्षांपासून अभियंता -म्हणून नोकरी करत आहे, तरीही ती कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीच्या धनी झाली. तीन ठिकाणी केलेल्या छापेमारीत १० लाखांचे सोने, ७७ हजारांची रोकड तसेच राजधानी भोपाळ, रायसेन व विदिशा जिल्ह्यांतील जमिनीसंदर्भातील संपत्तीचे दस्तावेज अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. तिच्याकडील बेहिशेबी मालमत्ता पाहता भ्रष्टाचार निवारण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या तिला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. चौकशीत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत तर न्यायालयापुढे हजर करून कोठडी मागितली जाईल, असे मनू व्यास म्हणाले. दरम्यान, हेमा मीनाने अवैधरीत्या बेहिशेबी मालमत्ता जमवल्याची तक्रार मिळाली. त्यानंतर आम्ही छापे टाकले, असे लोकायुक्त पोलिसांनी सांगितले.