High mileage diesel cars : आजकाल पेट्रोलच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे डीझेल कारला ग्राहकांची पसंती आहे. तुम्हीही सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या डिझेल कार कोणत्या याचा शोध घेत असाल तरया बातमीत तुम्हाला ही सर्व माहिती आहे. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देशातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या डिझेल कारची वैशिष्टये सांगणार आहोत.या कारचे लूक पण आकर्षक असून कंपनीने त्यात ग्राहकांसाठी विविध सुविधा सुद्धा दिलेल्या आहेत. . चला तर मग या कार कोणत्या आहेत,त्याची माहिती आता आपण करून घेणार आहोत.
1. Hyundai Venue
Hyundai Venue भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी कार डिझेल SUV च्या यादीत आहे. डिझेल वेन्यूला ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळत नाही, तर फक्त 6-स्पीड मॅन्युअल गिअर आहेत.इंजिन कार्यक्षमतेच्या बाबतीत सुद्धा ही कार उत्कुष्ट आहे. कारमध्ये Alcazar, Creta, Sonnet आणि Seltos प्रमाणेच 1.5-लीटर डिझेल इंजिन मिळते. मायलेजच्या बाबतीत, Hyundai Venue डिझेल 23.7kpl मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे.
2. Tata Nexon
Tata Nexon ही कार तुमचा खर्च वाचवण्यासाठी ओळखली जाते. या कारमध्ये पॅसिव्ह सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन वापरून RDE मानदंड हाताळण्याची सुविधा आहे. नेक्सॉन डिझेलमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे, जे 115hp पॉवर आणि 260Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कार एकतर 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. .मायलेजच्या बाबतीत, Nexon डिझेल मॅन्युअलसह 23.22kpl आणि स्वयंचलित ट्रांसमिशनसह 24.07kpl मायलेज देते.
3. Kia Sonet
Kia Seltos प्रमाणे, Sonet ला 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि मॅन्युअल ट्रान्समिशन ऐवजी iMT देखील मिळते. तथापि, सूचीतील इतर Hyundais प्रमाणे, याला समान 1.5-लीटर डिझेल इंजिन मिळते जे 115hp आणि 250Nm टॉर्क जनरेट करते. मॅन्युअल स्वरूपात सोनेट डिझेलचे मायलेज 24.1kpl आहे, तर स्वयंचलित ट्रांसमिशन 19kpl मायलेज देते.