Home Remedies for Acidity : ॲसिडीटी आजकाल आपले जीवन धकाधकीचे झालेले असले, तरी या आपल्या जीवनशैलीमध्ये बैठी कामे जास्त वाढलेली आहेत. घरामध्ये देखील सर्व सुखसोयी असल्याने शारीरिक श्रम कमी झाले आहेत. शारीरिक श्रम कमी झाल्याने खरे तर आपल्या शरीराला कमी अन्नाची गरज भासावयास हवी. पण तसे न होता, आपण खात असलेल्या अन्नाचे प्रमाण काही कमी झालेले नाही. शिवाय आजकालच्या आपल्या खानपानामध्ये प्रोसेस्ड अन्नपदार्थांची संख्याही वाढली आहे. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त कामाचा ताण, रात्रीची, वेळी – अवेळी किंवा अपुरी झोप, या सगळ्या कारणांमुळे ॲसिडीटीहोण्याची तक्रार वाढीला लागली आहे. ॲसिडीटीहा विकार पोटामधील पाचनरसांच्या असंतुलनामुळे उद्भवतो. पोट दुखणे, मळमळणे, गॅसेस होणे, डोकेदुखी, क्वचित प्रसंगी उलट्या होणे, ही सर्व ॲसिडीटीची सर्वसामान्यपणे आढळणारी लक्षणे आहेत. पण ॲसिडीटीचा त्रास होऊ लागताच औषधे घेण्यापेक्षा काही घरगुती उपायांच्या मदतीने ॲसिडीटी कमी करता येऊ शकते.
ॲसिडीटीचा त्रास होऊन पोटात जळजळ होत री असल्यास एक ग्लास गार दुधामध्ये साखर घालून, य हे दूध थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे पीत राहावे. दुधामध्ये असलेल्या कॅल्शियममुळे पोटातील ॲसिड्स संतुलित होऊन पोटातील जळजळ थांबते. त्याचप्रमाणे तुळशीची पाने चावून खाल्ल्यानेही पोटामधील पाचनरस क संतुलित होऊन ॲसिडीटीचा त्रास नाहीसा होतो. रकेळ्यामधील अधिक मात्रेमधील पोटॅशियम आणि वी फायबरमुळेही पोटामधील ॲसिड्सचा प्रभाव कमी से होतो, त्यामुळे ॲसिडीटीचा त्रास होत असल्यास या पिकलेले केळे खावे. बडीशेपमध्ये पोट थंड ठेवणारी तत्त्वे असून, त्याच्या सेवनाने बद्धकोष्ठाचा विकारही दूर होतो. बडीशेपेच्या सेवनाने पोटामध्ये अल्सर होत इ नाही. म्हणूनच आपल्याकडे जेवणानंतर बडीशेप खाण्याची पद्धत आहे. ॲसिडीटीचा त्रास ज्यांना वारंवार होतो, अशा व्यक्तींनी एक मोठा चमचा बडीशेप रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालावी व दुसऱ्या दिवशी हे पाणी थोडे थोडे पीत राहावे. तसेच ॲसिडीटी होत असल्यास, हिरव्या वेलचीचे काही दाणे पाण्यामध्ये उकळून घेऊन हे पाणी प्यायल्यानेही आराम पडतो. गुळामध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असल्याने जेवणानंतर – गुळाचा लहान खडा चघळल्यास ॲसिडीटीचा त्रास होत नाही. गुळाचा खडा पाण्यामध्ये घालून गुळ विरघळल्यानंतर ते पाणी प्यायल्यानेही आराम मिळतो. पाणी, आल्याचा रस, जिरे भिजत घातलेले पाणी हे सर्व ॲसिडीटी दूर करण्यास उपयुक्त आहेत.