ICICI Pru Gift Prof : ग्राहकांना लघु आणि दीर्घकालीन गरजा पूर्ण करता येणारी योजना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीने आयसीआयसीआय प्रु गिफ्ट प्रोच्या रूपाने आणली आहे. त्याअंतर्गत ग्राहकांना वर्षांगणिक वाढत जाणारे उत्पन्न मिळवण्याचा किंवा नियमितपणे ठरावीक रक्कम मिळवण्याचा पर्याय निवडता येईल. त्याशिवाय या बचत उत्पादनात देण्यात आलेल्या जीवन सुरक्षा कवचामुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते. आयसीआयसीआय प्रु गिफ्ट प्रो या योजनेत ग्राहकांना उत्पन्नाचे लाभ आणि प्रीमियम पेमेंटचे तपशील त्यांच्या गरजेप्रमाणे ठरवता येतील. त्याशिवाय इतर काही बाबी आपल्या सोयीप्रमाणे निवडण्याची सोय या योजनेत देण्यात आली आहे.
दीर्घकालीन उत्पन्नाबरोबरच आयसीआयसीआय प्रु गिफ्ट प्रोमध्ये ग्राहकांना मोठी रक्कम मिळवण्याचा पर्याय निवडता येतो. ग्राहकांना त्यांनी भरलेल्या प्रीमियमच्या १०० टक्क्यांपर्यंत कोणतीही रक्कम तसेच ती मिळण्याची वेळ निश्चित करता येते. या वैशिष्ट्याच्या मदतीने ग्राहकांना त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांचे उदा. घर घेणे, प्रियजनांसाठी वारसा ठेवणे किंवा निवृत्तीसाठी निधी उभारणे इत्यादीचे नियोजन करता येईल. उत्पन्न कालावधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विविध वैशिष्ट्यांनी युक्त या योजनेचे उत्पन्न त्यांच्या वारसांना मिळेल याची खात्री देण्यात आली आहे. आयसीआयसीआय प्र गिफ्ट प्रो ग्राहकांना प्रु त्यांच्या लघु आणि दीर्घकालीन गरजा पुरवण्याचा पर्याय देते.
आयसीआयसीआय प्रु गिफ्ट प्रोमध्ये प्रीमियम भरण्यासाठी ५ ते १२ वर्षांचा कालावधी देण्यात आला असल्यामुळे ग्राहकांना त्यांची सोय व ध्येयाच्या कालावधीनुसार बचत करता येते. त्याशिवाय ८ वर्षांनंतर त्यांना अगदी ३० वर्षे उत्पन्न मिळवणे सुरू ठेवता येऊ शकते. याबाबत आयसीआयसीआय प्रडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे प्रमुख वितरण अधिकारी अमित पाल्टा म्हणाले की, आयसीआयसीआय प्रु गिफ्ट प्रो हे दीर्घकालीन बचतीचे उत्पादन सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. हे उत्पादन अतिशय सोयीस्कर असून त्यातील विविध बाबी ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार ठरवता येतात. यामुळे ग्राहकांना आपली जीवनध्येये जास्त चांगल्या प्रकारे तयारी करून साध्य करता येतात. जीवन सुरक्षा कवचाबरोबरच हे उत्पादन कुटुंबाला आर्थिक सुरक्षाही पुरवते.
आयसीआयसीआय प्रू गिफ्ट प्रो ग्राहकांना त्यांच्या आर्थिक गरजेनुसार उत्पन्न मिळवून सक्षम करते. त्याशिवाय हे उत्पादन ग्राहकांना मोठी रक्कम कधी हवी, याची वेळ निश्चित करण्याची मुभा देत असल्यामुळे त्यांचे आर्थिक ध्येय खात्रीशीरपणे साध्य होते. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफने ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवत ४डी फ्रेमवर्क तयार केले असून वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये हा त्याच्या प्रमुख आधारस्तंभापैकी एक आहे. ग्राहकांच्या गरजा जाणून घेण्यासाठी त्यांच्यासह नियमितपणे संवाद साधण्याबरोबरच पारंपरिकमर्यादांपलीकडे जात जीवन विमा उत्पादनांचा कायापालट करण्यासाठी विविध उपक्रम सुरू आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
आज ग्राहकांपुढे विविध उत्पादने आणि सेवांचे पर्याय खुले आहेत, ज्यामध्ये त्यांना आपल्या सोयीनुसार तपशील निवडता येतात. आर्थिक सेवा क्षेत्रातही ग्राहकांना विश्वासार्ह आणि त्यांच्या गरजेनुसार आकार देता येऊ शकणारे आर्थिक उत्पादन हवे आहे. ग्राहकांशी संवाद साधताना लक्षात आलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, महागाईशी सामना करण्यासाठी त्यांना हवी असलेले सहकार्य. म्हणूनच आयसीआयसीआय प्रु गिफ्ट प्रो अंतर्गत आम्ही ग्राहकांना दरवर्षी वाढणारे उत्पन्न किंवा नियमित उत्पन्न असे दोन्ही पर्याय ३० वर्षे कालावधीपर्यंत मिळण्याचे पर्याय देतो. या विविध वैशिष्ट्यांनी युक्त उत्पादनाद्वारे ग्राहकांना सर्वसमावेशक, दीर्घकालीन | आर्थिक बचत करणे शक्य होते. यामध्ये ग्राहकाच्या गरजेनुसार आर्थिक संरक्षण आणि सोगीनुसार मिळणारे। उत्पन्न यांचा योग्य मेळ घालण्यात आला आहे.