मोबाईल ग्राहकांची पहिली पसंती असेलल्या Apple ने नवीन मोबाईल बाजारात आणले आहेत. Apple ने नुकतीच आपल्या ग्राहकांसाठी iPhone 15 नवीन सीरीज लाँच केली आहे.या सीरिजमध्ये आयफोनचे चार नवीन मॉडेल iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.
Apple कंपनीने आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स हे फोन चार रंगात उपलब्ध केले आहेत. यात नॅचरल टायटॅनियम, ब्लॅक टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम असे चार रंग असून आपल्या आवडीनुसार ग्राहकांना हे मोबाईल खरेदी करता येणार आहेत . तुम्ही आयफोन 15 प्रो हा मोबाईल आकर्षक रंगात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या बातमीत सविस्तर माहिती देणार आहोत.
वास्तविक, दुबईतील लक्झरी क्लास डिव्हाईस बनवणारी कॅविअर युजर्सना गोल्डन चेसिस असलेले प्रो मॉडेल्स खरेदी करण्याची संधी देत आहे. या आयफोन मॉडेल्सना अल्ट्रा गोल्ड म्हटले जात आहे.iPhone 15 Pro Ultra Gold च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 7,39,651 ($8,890) च्या सुरुवातीच्या किंमतीनंतर, ते Rs 8,22,951 ($9,890) वर जाते. iPhone 15 Pro Max Ultra Gold ची किंमत Rs 8,04,682 ($9,670) पासून सुरू होते आणि Rs 8,64,597 ($10,390) पर्यंत जाते. खरं तर, अल्ट्रा गोल्ड मॉडेल्समध्ये तुम्हाला 18 कॅरेट सोन्याचे चेसिस सॅटिन फिनिश मिळते. त्याचबरोबर अॅपलचा लोगो 24 कॅरेट सोन्याने बनवण्यात आला आहे.
जे वापरकर्ते वेगळ्या आणि खास स्टाइलसाठी Apple iPhone खरेदी करू इच्छितात त्यांना हे मॉडेल आवडू शकतात. यामध्ये खेळाडूंपासून ते सेलिब्रिटींचा समावेश असू शकतो.अल्ट्रा गोल्ड व्यतिरिक्त कंपनीने यूजर्ससाठी इतर अनेक मॉडेल्स देखील सादर केले आहेत. यात वापरकर्ते अल्ट्रा ब्लॅक, टायटन ब्लॅक, स्टाररी नाईट, गडद लाल या रंगांची निवड करू शकतात.