IPl 2023
अहमदाबाद : क्रिकेट खेळाच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून आयपीएल अर्थात इंडियन प्रिमीअर लीगच्या 16 व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना अहमदाबाद येथे आज सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सुरू होईल. या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि जिओ सिनेमा ॲप वर होणार आहे. या सामन्यांच्या उद्घाटनासाठी रंगारंग सोहळा आयोजित करण्यात आलेला असून विविध क्षेत्रातील मान्यकलाकारांची यावेळी उपस्थिती राहणार असून गत विजेता गुजरात टायटन्स आणि चार वेळा विजेता राहिलेल्या चेन्नई सुपर किंग यांच्यात सलामीची होणार आहे .
क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला
पहिल्या लढतीत अनुभवी महेंद्रसिंग धोनी पुढे अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाचा कस लागेल. कोरोना संसर्गानंतर पहिल्यांदा स्पर्धा देशभरातील विविध १२ स्थळांवर ३१ मार्च ते २८ मे या काळात (७४ सामने) या कालावधीत खेळवण्यात येणार असल्यामुळे पुढील दोन महिन्यांच्या काळात देशभरात क्रिकेट चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असेल.पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने पद्यर्पणाच्या हंगामात विजेतेपदाला गवसणी चालत सर्वांना आश्चयाचा धक्का दिला होता. अंतिम फेरीत त्यानी राजस्थानला ७ गडी राखून विजय मिळवला होता. गुजरातने साखळीत जिंकलेल्या १० लढतीमुळे बादफेरीपासून त्यांच्याकडे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते. गुजरातने संघ निवडतानाच अष्टपैलू खेळाडूंना पसंती देण्यात आली. त्यामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या राहुल तेवडिया, शिवम मावी, विजय शंकर आणि रशिद खान असे अष्टपैलू गुजरातच्या चमूत आहेत. चेन्नई संघ हंगामात गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता, 14 सामन्यात 10 पराभव आणि 4 विजय अशी त्यांची कामगिरी होती. कर्णधार धोनी गेल्या महिन्यापासून चेन्नई ठोकून असल्यामुळे यंदा चेन्नईची बसलेली गाडी रुळावर येईल असा विश्वास त्यांच्या चाचांना वाटत आहे चेन्नईच्या नावाची सुरुवात ऋतुराज गायकवाड कळेल अजिंक्य रहाणे व अंबती रायडू यांची साथ त्याला लाभणार आहे तसेच त्यापाठोपाठ धोनी आणि जडेजा सुद्धा आहेतच अतिरिक्त एसटी रक्षक फलंदाज डेवान हा सुद्धा फलंदाज म्हणून आहे. गोलंदाजीची मुख्य मदार दीपक चाहरवर आहे. तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, महीक्षा पक्षिणा हे गोलंदाज पण आहेत.
चेन्नई सुपर किंग्जचा संघ
सलामीवीर : डेवान कान्वे, ऋतूराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, शुभ्रांशू सेनापती, यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी, अष्टपैलू बेन स्टोक्स, मोईन अली, शिवम दुबे, डेवान पिटोरिअस निवेल सैंटनर, रवी जय मंडल भगत वर्मा, फिरकीपटू प्रशांत सोलंकी मदीक्षा शिक्षणा, वेगवान गोलंदाज : तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, महीक्षा पक्षिणा, सिमरनीत सिंग, दीपक चाहर, कायले जेमीनसन, राजवर्धन हंगरगेकर, निशांत संधू
गुजरात टायटन्सचा संघ
सलामीवीर शुभमन गिल, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, बी. साई सुदर्शन, यष्टिरिद्धिमान मॅथ्यू वेड, रिद्धीमन सहा, श्रीकर भारत, उर्वी पटेल, अष्टपैलू हार्दिक पंड्या, दर्शन नलकांडे, राहुल तेवतिया, विजय शंकर, रासिद खान, ओडेयन स्मिथ, फिरकीपटू: जयंत यादव, नूर अहमद, आर. साई किशोन, वेगवान गोलंदाज : प्रदीप सांगवान, अल्झारी जोसेफ, मोहम्मद शमी, यश दयाल शिवम मावी, जोशुआ लिटल, मोहित शर्मा