Jalgaon jamod
सोनाळा :अंधेर नगरी चौपट राज याला अनुसरून
शेवगा बु ता .संग्रामपूर येथील ग्रामपंचायत चे राज सुरु असल्याचे उद्यड झाले आहे . सन २०२० पासून घरकुल ऑनलाईन यादीत नाव समाविष्ठ असतांना एका ७४ वर्षीय वृद्धाची पायपीट सुरू असल्याचे उजेडात आले आहे .दोनदा घरकुल फाईल दिल्यावर
सुद्धा ग्रामसेवकाचा उद्दाम पणा उद्यड आहे . याबाबत जिल्हा परिषद ते पंचायत समिती ला चकरा काटून घरकुल देता का घरकुल असा टाहो फोडला . मात्र न्याय मिळण्या ऐवजी वृद्धाच्या चपला फाटल्या आहेत . प्रधानमंत्री घरकुल योजतेत हा प्रकार उघडकीस आला आहे .आनंदराव गोविद सपकाळ रा . शेवगा असे घरकुला पासून वंचित वृद्धाचे नाव आहे . ऑनलाईन घरकुल यादीत त्यांचे नाव आल्याने शेवगा बु . ग्रा .पं. ने त्यांना २० सप्टेंबर २० रोजी कागदपत्रा सह घरकुल फाईल देण्याची नोटीस दिली . त्यांनी जागेच्या आठ अ सह तत्काळ फाईल दिली . मात्र गावात राजकीय मांजर आडवी गेल्याने त्यांना घरकुला पासून वेचित ठेवण्यात आले . तर त्या नंतर ५ फेब्रुवारी २४ ला त्यांनी ग्रा पं नोटीस नुसार पुन्हा फाईल दिली . गावात त्यांची ३० x १० जागा खरेदी खत क्र ६२७२०१७ दि ३० नोव्हेंबर २० ही ग्रामपंचायत ला नोंद करण्यात आली आहे . तरीही त्यांना घरकुल पासून बाद ठरविले आहे . ही जागा नोंद आहे .मात्र रस्त्याचा काही वाद आहे . गावातील गजानन सपकाळ यांनी ग्रामपंचायतीला तक्रार दिली आहे . म्हणून ग्रामपंचायत ने घरकुल थांबविल्याचे समोर आले आहे .याबाबत ग्रामसेवक राम डाबेराव यांनी वाद असल्याचे सांगितले .मात्र तो वाद सामोपचाराने निपटविण्यासाठी ग्रामपंचायत ने पुढाकार का घेतला नाही .व नेमका वाद कशाचा आहे . घरकुल थांबविता येते का हे सांगायला बगल दिली . त्यामूळे माशी कुठे तरी शिकली असल्याचे स्पष्ट दिसत आहे .वृद्धाला नाहक हेलपाटे देऊन हम करे सौ कायदा या प्रमाणे ग्रामपंचायत गावगाडा हाकत असल्याने रोष व्यक्त होत आहे .