Khamgoan
खामगाव – ग्रामीण भागातील विजेच्या समस्येने शेतकरी पुरते त्रस्त झाले असून कुंभकर्णी झोपेत असलेल्या महावितरणला जागे करण्याकरिता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज शेतकऱ्यांसह महावितरण कार्यालयात पुन्हा धडक देऊन अधिकारी जयस्वाल यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी ग्रामीण भागातील वीज समस्यांबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाढा वाचून अधिकाऱ्यांना निरुत्तर केले.
या आंदोलनात बाबत माहिती देताना शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र बघे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांना होत असलेल्या विजेच्या त्रासाबद्दल महावितरणला निवेदन दिले होते. परंतु अद्याप पर्यंत त्यावर दखल घेतली गेली नाही. यामुळे शिवसेना पदाधिकारी व शेतकरी आज पुन्हा महावितरण कार्यालयावर धडकले व उपस्थित असलेले महावितरण एसडिओ जयस्वाल यांना चांगलेच धारेवर धरले. तालुक्यात बहुतांश गावांमधील डीपी लोड जास्त असल्यामुळे दोन-चार दिवसात फेल होत आहेत.याबाबत पाच ते सहा महिन्यापासून सांगून सुद्धा डीपीचा साधा सर्वे सुद्धा महावितरणचे अधिकारी व कर्मचारी करीत नाहीत. महावितरण मध्ये कुणालाच अधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही. जेई म्हणतात लाईनमन ऐकत नाही, एसडिओ जयस्वाल यांचे जेई ऐकत नाही. ट्रांसफार्मर फेल झाला तर दोन-चार दिवस लाईनमन फ्लेवर रिपोर्ट टाकत नाही. त्यानंतर पाच-सहा दिवस जेई फेलिव्हर रिपोर्ट मेंटेनेस ऑफिसला टाकत नाही तीन-चार वेळा सांगल्यानंतर दहा-बारा दिवस यामध्ये गेल्यानंतर चार-पाच दिवस मेंटेनेस ऑफिस घेते मग ट्रांसफार्मर मिळायला लागतात पंधरा दिवस तोपर्यंत शेतकऱ्याचे पिक सुकून जातात किंवा वाळून जातात तरीसुद्धा कुंभकणी झोपेत असलेल महावितरण लक्ष द्यायला तयार नाही, अशा शब्दात बघे यांनी महावितरणचा कारभार चव्हाट्यावर आणला.
शिवसेनेच्या आक्रमक आंदोलनानंतर महावितरण एसडीओ जयस्वाल यांनी संबंधित इंजिनियर, लाईनमन यांना फोन करून मला उद्याला सर्वे करून इस्टिमेट सादर करा, ज्याठीकणी वरलोड डीपी आहेत, तिथे लवकरात लवकर नवीन डीपी देण्याचे प्रयत्न करू व फेल झालेले ट्रान्सफर उद्यालाच देऊ असे आश्वासन दिले, त्यामध्ये प्रामुख्याने नांगे डीपी अंबिकापुर चितोडा,सागर मेतकर डीपी शहापूर, पांझाळे डीपी कारेगाव हिंगणा,भालेगाव बाजार या गावातील टिप्यांचा समावेश असून पिंप्री गवळी येथील अनंतराव केने यांच्या शेतातील महावितरण यांनी काढून नेलेल्या चार पोल वरती ताराचा समावेश आहे. हे सर्व कामे करण्याचे आश्वासन पूर्ण न केल्यास पुन्हा शिवसेना आक्रमक भूमिकेत दिसेल असा इशारा यावेळी बघे यांनी दिला. या आंदोलन प्रसंगी शिवसेना उप जिल्हाप्रमुख संजय अवताडे, तालुका प्रमुख राजेंद्र बघे विधानसभा संपर्क प्रमुख सुरेश वावगे, युवासेना तालुका प्रमुख बहादुर वाघे, युवासेना उप जिल्हाप्रमुख संजय पाटील, शिवसेना उपतालुकाप्रमुख गोपाल भिल, किसान सेना उपजिल्हाप्रमुख अनिरुद्ध नेमाने,गोपाल चव्हाण,गोपाल शेळके,रामचंद्र नागे,मानिक भिल,वासुदेव उगले,पुरुषोत्तम दांडळे,प्रलाद नागे,सचिन नागे,मल्हारी चिकटे,अरुण बगाडे,हरिदास उन्हाळे,रुपेश चींचोले,शहजाद खान,भागवत चीकटे, मंगेश ईंगळे आदी उपस्थित होते.