Khamgaon News
खामगाव: अमरावती पदवीधर मतदार संघात ऐतिहासिक विजय संपादन करणारे महाविकास आघाडीचे धिरज लिंगाडे यांच्या विजयाबदद्ल 4 फेब्रुवारी रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली गांधी चैक येथील जनसंपर्क कार्यालयासमोर नेते व पदाधिकाऱ्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला त्याप्रंसगी ते बोलत होते.
दिलीपकुमार सानंदा यांची प्रतिक्रिया
दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सत्ता असतांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये पाच पैकी चार जागांवर पदवीधर मतदार राजांनी सत्ताधारी भाजपाला नाकारुन महाविकास आघाडीच्या बाजुने कौल दिला आहे. अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रतिष्ठेची बनविली होती. शिंदे गट व भाजपाने आपली सर्व शक्ती पणाला लावल्यानंतर देखील या ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार धिरजभाऊ लिंगाडे यांचा विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय असुन महाविकास आघाडीच्या कार्यकत्र्यांमध्ये ऊर्जा निर्माण करणारा आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी दिली आहे.
आगामी निवडणुकीत विजयाचा विश्वास
ही तर विजयाची सुरुवात आहे. भविश्यातही अषीच एकजुटता कायम ठेवुन येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकेलच असा विश्वास सुद्धा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी नगराध्यक्ष गणेश माने, शिवसेनेचे संघटक रवि महाले, तालुकाप्रमुख बंडु बोदडे, शहर प्रमुख विजय इंगळे, उपतालुका प्रमुख विजय बोर्डे, काॅंग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, महिला काॅंग्रेसच्या शहर अध्यक्ष सौ.सुरजितकौर सलुजा, शेगाव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, माजी नगरसेवक किशोरआप्पा भोसले, माजी जि.प.सभापती सुरेश वनारे, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मतदारांचे मानले आभार
पुढे बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, विरोधक कितीही मोठा असो दिल्लीपासुन ते गल्लीपर्यंत कुणाचीही सत्ता असो, जे सरकार जनतेच्या हिताविरुध्द निर्णय घेईल त्याला मतदार राजा त्याची जागा दाखविल्याशिवाय राहत नाही हे पदवीधर मतदार संघाच्या निकालाने सिध्द झाले आहे. राज्यामध्ये पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत पाच पैकी चार जागांवर महाविकास आघाडीच्या बाजुने जनतेने कौल दिला आहे. मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित पदवीधर आमदार हे शर्थीचे प्रयत्न करतील असा विश्वास सानंदांनी व्यक्त करुन आपण 30 तारखेला मतदानाच्या दिवशी विजयाचा गुलाल हा महाविकास आघाडीचे उमेदवार धिरजभाऊ लिंगाडे यांच्याच अंगावर पडेल व ते विजयी होतील असा ठाम निर्धार व्यक्त केला होता, असे सांगून खामगाव विधानसभा मतदार संघातील पदवीधर मतदारांनी आमदार धिरजभाऊ लिंगाडे यांना आशिर्वादरुपी मते देवुन विजयी केल्याबदद्ल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सर्व मतदार बांधवांचे आभार मानले. यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.