Maharashtra Monsoon Alert : सर्वाना पावसाचे वेध लागले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा पाऊस अजूनही सर्वदूर आणि सार्वत्रिक असा बरसला नाही. जूनचा महिना आता संपत आला आहे. तरी मात्र राज्यात पाहिजे त्या प्रमाणात मान्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. दरम्यान आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मान्सून सक्रिय झाला असला तर बऱ्याच ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे. आहे. शनिवारी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. विदर्भातील काही जिल्हे आणि मुंबईत पावसाचे आगमन झाले दरम्यान, आता येत्या पाच दिवसांत राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासंदर्भात पुणे वेधशाळेने अंदाज वर्तविला आहे. त्याबद्दल माहिती या बातमीत जाणून घेणार आहोत.
गेल्या अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपणार असून येत्या ५ दिवसात महाराष्ट्र राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस बरसेल असा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तविला आहे. . हवामान खात्याने काही भागात सतर्कतेचा (Maharashtra Monsoon Alert )इशारा जारी केला आहे. यंदा देशात उशिराने पाऊस आला असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. जून संपत आला तरी पावसाने हजेरी लावलेली नाही. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने पिके अडचणीत आली आहेत. याशिवाय एल निनो आणि बिपजॉय चक्रीवादळाचाही मान्सूनच्या मार्गावर परिणाम झाला. हवामान खात्याने वर्तवलेले सर्व अंदाज चुकीचे आहेत. त्यामुळे सर्वांनाच मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, यंदा मान्सून मागे सरकत असून, विदर्भात त्याचे प्रथम दर्शन घडले आहे. दरम्यान, येत्या पाच दिवसांत राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
आनंद वार्ता: आज 25 Jun ला मान्सून संपूर्ण #महाराष्ट्र राज्यात दाखल झाला.
संपूर्ण राज्यासाठी सरासरी ता. 15 Jun आहे. मान्सून राज्याची सीमा ओलांडून अजून वर सरकला आहे.
IMD pic.twitter.com/DN7BdCIVbe
- Advertisement -
- Advertisement -
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 25, 2023
पुणे वेधशाळेचे (Maharashtra Monsoon Alert )संचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.त्याची आज आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही अधिकृत माहिती दिली आहे. येत्या ५ दिवसांत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भात अनेक दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मरसवाड्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचे ट्विट त्यांनी केले. हवामान खात्याने महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ , मराठवाडा आणि कोकणात पावसाच्या सरी आणि जोरदार वारे येण्याची शक्यता वर्तवली असून काही भागांसाठी अलर्ट जारी केले आहेत. हवामानाच्या अंदाजानुसार मच्छिमारांना मासेमारीला न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे, तर मराठवाडा भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा.. सुंदर मुलीशी लग्न करा आणि ७१ लाख रुपये मिळवा !