Mauli Water Park Shegaon : संतनगरी शेगाव येथे येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना तसेच बुलडाणा जिल्ह्यातील नागरिक रणरणत्या उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी शेगावच्या माऊली वॉटर पार्कला भेट देत आहे. इथे खूप मौज मजा करून वॉटर पार्कचा आनंद घेताना दिसत आहेत.
शेगावच्या माऊली वॉटर लेझी लिवर, वेव्ह पूल, मल्टीलाइन स्लाइड, क्रेझी क्रूझ स्लाइड, पेंडुलम स्लाइड, टॉर्नेडो स्लाइड, MPWS पूल, बेबी पूल, रेन डान्स आणि बरंच असून कॉस्ट्यूम सेंटर (महिला आणि पुरुषांसाठी)
पार्किंगची सोय, लॉकर सुविधा, कॅन्टीन सुविधा सुद्धा आहेत. विविध फ्रुट, आईस्क्रीम सुद्धा यासह पेट पूजा करण्यासाठी बरच काही शेगावच्या माऊली वॉटर पार्क मध्ये आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे खामगाव रस्त्यावर माउली इंजनिअरींग कॉलेजला लागून माऊली वॉटर पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. या माऊली वॉटर पार्क मध्ये १० पेक्षा जास्त स्लाईड, लेझी रिव्हर, वेव्ह पूल, रेन डान्स यासह विविध वॉटर गेम्सचा आनंद लुटता येणार आहे. तसेच विविध खाद्य पदार्थ, आईस्कीमचे स्टोल ग्राहकांच्या सेवेत आहेत.
बाहेर फिरायला गेल्यावर तणावातून मुक्त होण्यासाठी आपला वेळ आता चांगल्या ठिकाणी घालवावा असे सर्वाना वाटत असते. आता ही संधी बुलढाणा जिल्हातील माऊली वॉटर पार्कमध्ये मिळणार आहे. संतनगरी शेगाव येथे येणारे भाविक तसेच जिल्ह्यातील नागरिकांना माऊली वॉटर पार्कचा आनंद घेता आहेत. रणरणत्या उन्हापासून दिलासा हवा तर एकदा आपण या वॉटर पार्क ला अवश्य भेट द्या….