वा ! MG Comet EV लॉन्च
मुंबई : सध्या बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. ग्राहकांची आवड आणि गरज लक्षात घेता एमजी मोटर्सने एक जबरदस्त कार बाजारात आणली आहे. MG Comet EV छोटी इलेक्ट्रिक कॉमेट ईव्ही ही आपली नवीन कार एमजी मोटर्सने नुकतीच लॉन्च केलीआहे. देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार असून त्यात जबरदस्त फिचर आहेत. कंपनीनेया कारची किंमत ७.९८ लाख रुपये ठेवली असून ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचा दावा केला गेला आहे. तसेच कंपनीचा दावा आहे की ही कार फुल चार्जमध्ये २३० किलोमीटरची रेंज देणार आहे. ही कार थेट स्पर्धा टाटा टियागो ईव्हीशी होणार आहे. आज आम्ही तुम्हाला MG Comet EV ची अशी पाच वैशिष्ट्ये आपण या बातमीत जाणून घेणार आहोत. इतक्या स्वस्त किमतीत कोणत्याही कारमध्ये उपलब्ध नाहीत अश्या सुविधा तुम्हला आता या कार मध्ये मिळणार आहेत.
अश्या खास सुविधामुळे MG Comet EV ला मिळतेय पसंती
आकर्षक डिझाईन
MG Comet EV चे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे इलेक्ट्रिक कारचे डिझाइन आहे. यात २ दरवाजांच्या डिझाइनसह एकूण ४ सिट्स आहेत. समोर दोन दरवाजे आणि मागील बाजूस बूट उघडणारा दरवाजा आहे. मागच्या सीट्समध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला पुढच्या सीटवर टेकावे लागेल. खास गोष्ट म्हणजे तुम्ही मागची सीटही फोल्ड करू शकता.
- Advertisement -
- Advertisement -
स्टार्ट करण्यासाठी ब्रेक पेडल
इलेक्ट्रिक कार सुरू करण्यासाठी कोणतेही बटण उपलब्ध नाही की, दाबूनही तुम्ही ते सुरू करू शकत नाही. वाहन सुरू करण्यासाठी, तुम्हाला फक्त ब्रेक पेडल दोनदा दाबावे लागेल आणि ते जाण्यासाठी तयार होईल. ते बंद करण्याचा मार्ग देखील खूप सोपा आहे. तुम्हाला वाहनातून बाहेर पडून चावीमध्ये दिलेले लॉक बटण दाबावे लागेल.
स्मार्टफोनवर कारची कनेक्टिव्हिटी
विशेष बाब म्हणजे, MG Comedy EV मध्ये तुम्हाला वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto ची सुविधा देण्यात आली आहे. जे या किमतीच्या कोणत्याही वाहनात पाहणे दुर्मिळ आहे. या वैशिष्ट्याचा अर्थ असा आहे की, तुम्ही तुमचा स्मार्टफोन केबलशिवाय इन्फोटेनमेंट सिस्टमशी कनेक्ट करू शकता.
कारमध्ये दोन डिस्प्ले
MG Comet EV मध्ये तुम्हाला एक नाही तर दोन डिस्प्ले देण्यात आले आहेत. यात १०.२५-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले आणि १०.२५-इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले आहे. कंपनीने हे दोन्ही डिस्प्ले एकमेकांशी जोडले आहेत. Mahindra XUV 700 आणि बर्याच मर्सिडीज कारमध्ये अशीच रचना पाहिली आहे.
डिजिटल चावी
MG Comet EV सह, तुम्हाला डिजिटल की, म्हणजेच डिजिटल कीचे वैशिष्ट्य देखील मिळते. ही की तुमच्या स्मार्टफोनमध्ये काम करते आणि तुम्ही ती इतर कोणाशीही शेअर करू शकता. म्हणजेच जर तुम्ही चावी घरी विसरला असाल तर तुमचा स्मार्टफोन तुमची चावी बनेल आणि तुम्हाला मूळ चावी नसतानाही वाहन वापरता येईल.
खालील महत्वाच्या बातम्या वाचा …
शरीरसुखास पती नकार द्यायचा, नंतर तिला जे कळलं ते खूपच धक्कादायक होतं..
शेतकऱ्यांची चिंता मिटली; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली पावसाबाबत महत्वाची माहिती
एसटी महामंडळाची आता आणखी एक मोफत प्रवास योजना!
कसा घडतो सायबर क्राईम; वाचा या पाच घटना आणि अशी टाळा फसवणूक
बुलढाणा जिल्ह्यातील भेडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर