बुलढाणा :Meteorologist Punjabrao Dakh हे नाव आता खूप प्रसिद्ध जाहले असून ते monsoon update अचूक देतात. हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक आहेत. त्यांचे हवामान विषयी अंदाज व monsoon update अचूक असतात. लवकरच Monsoon चे आगमन होईल. पावसाळा लागणार असून यावर्षी मान्सून कसा राहील,या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी बातमी पंजाब डख यांनी दिली आहे. Panjab Dakh Kon ? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर देखील या बातमीत मिळेल. तसेच पंजाब डख यांचे शिक्षण किती आहे, पंजाब डख यांचा मोबाईल नंबर काय आहे हे सर्व माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.
८ जूनला मृग नक्षत्राचे आगमन
गेल्यावर्षापेक्षा यावर्षी म्हणजे २०२३ मध्ये चांगला Monsoon चा पाऊस पडणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगत जून महिन्यात ८ जूनला मृग नक्षत्राचे आगमन होणार आहे; महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस पडणार नाही. २२ जूनपासून सर्वत्र पाऊस पडणार आहे. २७, २८ जूनपासून शेतकरी सोयाबीन व इतर पीक पेरणी करतील, अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यातील जलंब येथील वामनदादा कर्डक नगरमध्ये जि. प. कन्या शाळेच्या प्रांगणात आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा जलंब ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी सरपंच मंगला उत्तम घोपे तर अतिथी म्हणून बाजार भाव अभ्यासक पुरुषोत्तम मेतकर, माजी पं. स. सदस्य विठ्ठल सोनटक्के, सारथी तंत्रज्ञ परशराम आखरे, उपसरपंच महेश गव्हांदे, ग्रा. पं. सदस्या दुर्गा गव्हांदे, पल्लवी सोनटक्के, प्रकाश देवचे, महादेव सोनटक्के, रामभाऊ धामणकार, उत्तम घोपे, सुरेश गव्हांदे, बाबुराव सरदार उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन अमोल काळे यांनी केले. या शेतकरी मेळाव्याला पंचक्रोशीतील शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
जुलै महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस
यावर्षी जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे. तसेच ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांमध्येसुद्धा भरपूर पाऊस पडणार आहे. यावेळी त्यांनी सन २०३५ पर्यंतचे पावसाचे अंदाजसुद्धा आहेत, असेही त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
दोन वर्षांच्या कोरोना कार्यकाळामध्ये सर्व कंपन्या बंद पडल्या, बंद केल्या. मात्र, एकमेव अशी कंपनी आहे की बळीराजाची कंपनी ही बंद पडणार नाही व भविष्यामध्ये दोनच कंपन्या चालू राहतील. त्यापैकी एक कंपनी म्हणजे शेतकरी कंपनी व दुसरी कंपनी म्हणजे मेडिकल व दवाखाने हे राहतील. शेवटी शेतकरी हा राजा आहे व तो राजाच राहणार आहे, असेही ते म्हणाले.
- Advertisement -
- Advertisement -
Panjab Dakh Kon ?
Meteorologist Punjabrao Dakh हे नाव आता खूप प्रसिद्ध जाहले असून ते monsoon update अचूक देतात हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक आहेत. Panjab Dakh Kon ? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर देखील या बातमीत मिळेल. तसेच पंजाब डख यांचे शिक्षण किती आहे, पंजाब डख यांचा मोबाईल नंबर काय आहे हे सर्व माहिती सुद्धा आपण जाणून घेणार आहोत.पंजाब डख की मूळचे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव येथील शेतकरी असल्याने टीव्हीवर नियमित हवामान अंदाज ऐकण्याची त्यांची सवय. हवामान अंदाज ऐकल्यानंतर पंजाब डख वडिलांसोबत सातत्याने पावसाच्या अंदाजावर चर्चा करायचे आपली स्वतःची निरीक्षणांची नोंद करायचे अनेकदा पंजाब डख यांनी केलेले निरीक्षण तंतोतंत बरोबर यायचे यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पावसाचा अचूक अंदाज मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतीकामात त्याचा फायदा झाला.त्यांनी सांगितलेला हवामान अंदाज पाऊस कधी येणार आहे कोणत्या तारखेला येणारा पाऊस रात्री किती दिवसात पाऊस किती प्रमाणात पडणार आहे याची माहिती द्यायचे.
Panjab Dakh यांचा अंदाज का ठरतो खरा ?
याची माहिती अगदी तंतोतंत खरी असायची अनेक वेळा सरकारी हवामान खात्याने शेतकऱ्यांची निराशा केली भाकित वर्तवले काय आणि प्रत्यक्षात पडले वेगळेच यामुळे सरकारी हवामान अंदाजाची विश्वासार्हता कमी झाली आणि पंजाब डख या हवामान तज्ञाने शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचून त्यांची मने जिंकली अंदाजे हवामान भाकित सांगत नाही ते सांगतात (Panjab Dakh Kon Aahe) ते सर्व शास्त्रशुद्ध व सखोल निरीक्षणावर आधारित असते.यासाठी ते संगणकाचा वापर करतात उपग्रह नकाशा यांचा अभ्यास करून निरीक्षणांची नोंद करून अंदाज व्यक्त करतात करोडो रुपयांचा हत्ती पोहोचणारी सरकारी सॅटॅलाइट यंत्रणा पंजाब डख यांच्यासमोर तोकडी पडतांना दिसत आहे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
Panjab Dakh यांच्या कडे शेती किती
Panjab Dakh यांच्या कडे शेती किती आहे , Panjab Dakh यांच्या कडे शेती किती आहे यांचे शिक्षण किती आहे, असा प्रश्न देखील लोक विचारत असतात. Panjab Dakh पावसाचा अंदाज व धोक्याच्या सूचना, monsoon update अगोदर सांगत असल्याने शेतकरी सतर्क राहून आपली कामा आवरत असतात शेतीचे कुठले काम प्राधान्याने करावे हे त्यांना समजते अतिवृष्टी अल्यास पिके सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वसूचना मिळतात गारांचा पाऊस कोठे व कधी पडेल पाऊस किती प्रमाणात पडेल पाऊस दिवसा पडेल की रात्री पडेल याची अचूक माहिती तालुक्या नुसार आणि गावानुसार ते कळवत असतात एकूण 10 एकर शेती असून ते हवामान आधारित शेती करतात व ते शेती मध्ये सोयाबीन, हरभरा हे पिके घेतात सोयाबीन, हरभरा पिकांमध्ये ते जास्तीत जास्त उत्पन घेतात. पंजाब जिल्हा परिषद शाळेवर सध्या अंशकालीन शिक्षक सुद्धा आहे त्यांचे शिक्षण ETD आणि CTC यांचे शिक्षण झाले आहेत.
Panjab Dakh मोबाईल नंबर ?
डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा हितासाठी Whatsapp ग्रुप तयार केले आहे, त्यावर ते रोजचे हवामान अंदाज देत असतात, पंजाब डख यांचा मोबाईल नंबर ९१५८१०१०५२ हा आहे. या नंबरवर whats app account सुद्धा आहे.
खालील महत्वाच्या बातम्या वाचा …
एसटी बसची ‘ही’ सुविधा घ्या; राज्यात कोठेही आणि कितीही वेळा प्रवास करा!
पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता; शोधून देणाऱ्यास ५१ रुपयांचा बक्षीस
बुलढाणा जिल्ह्यातील भेडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर
वीज दरवाढ केल्यानंतर आता महावितरणचा पुन्हा ग्राहकांना असा झटका