Motorola Smart TV : तंत्रज्ञानाच्या युगात आजकाल अत्याधुनिक इलेक्ट्रिक गॅजेट्स येत आहे. यातच आजकल कमी किंमतीत चांगले स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहे. मोटोरोलाने ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत नवीन मोटोरोला एनव्हिजन मालिका लॉन्च केली आहे. या मालिकेत कंपनीने 32 इंच, 43 इंच आणि 55 इंच मॉडेल लॉन्च केले आहेत.
आम्ही तुम्हाला सांगतो की हे मॉडेल्स बेझल-लेस डिस्प्ले डिझाइन, ड्युअल बँड वाय-फाय आणि मीडियाटेक क्वाड कोर प्रोसेसरने भरलेले आहेत. मोटोरोलाच्या या लेटेस्ट टीव्ही मॉडेलची किंमत काय असणार आहे? तसेच या टीव्ही मॉडेल्समध्ये तुम्हाला कोणते फीचर्स मिळणार आहे याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
Motorola Envision Series चे फीचर्स
32-इंच मॉडेल HD रेडी आहे, जे तुम्हाला 1366 x 768 पिक्सेल रिझोल्यूशन देईल, तुम्हाला 270 निट्स ब्राइटनेस आणि 178-डिग्री व्ह्यूइंग अँगलसह 32-इंचाचा प्रकार मिळेल.
43-इंचाच्या मॉडेलबद्दल बोलायचे झाले तर हा टीव्ही फुल एचडी डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 270 निट्स ब्राइटनेस मिळेल आणि हा टीव्ही 1920 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह लॉन्च करण्यात आला आहे.
43-इंच आणि 55-इंच मॉडेल 4K डिस्प्ले, 330 nits ब्राइटनेस, 178 डिग्री व्ह्यूइंग अँगल आणि 3840×2160 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतात.
फीचर्स : याशिवाय कंपनीने ही टीव्ही सीरीज क्वाड कोअर मीडियाटेक प्रोसेसर, 8 जीबी इंटरनल स्टोरेजसह लॉन्च केली आहे. RAM बद्दल बोलायचे झाले तर 1 GB रॅम HD आणि Full HD प्रकारात उपलब्ध असेल, तर 2 GB रॅम 4K मॉडेलमध्ये उपलब्ध असेल.
- Advertisement -
- Advertisement -
ऑपरेटिंग सिस्टम : ही नवीनतम टीव्ही मालिका Android TV 11 वर काम करते. कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला या मालिकेत 2 USB 2.0 पोर्ट आणि इथरनेटसह अनेक उपयुक्त वैशिष्ट्ये मिळतील. उत्तम आवाजासाठी 20 वॅटचे स्पीकर देण्यात आले आहेत.
जाणून घ्या किंमत : 32-इंचाच्या टीव्ही मॉडेलची किंमत 9,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे, तर 43-इंचाच्या फुल एचडी मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. 43 इंच 4K टीव्ही मॉडेलची किंमत 21 हजार 999 रुपये आणि 55 इंच 4K टीव्हीची किंमत 31 हजार 999 रुपये आहे. विक्रीच्या तारखेबद्दल बोलायचे तर, फ्लिपकार्ट समर बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये या मॉडेल्सची विक्री 7 मे पासून सुरू झाली आहे.