Nagpur Crime news
नागपूर : ‘बंटी और बबली’ चित्रपटामध्ये अनेकांना गंडा घालणाऱ्या अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीची धम्माल पाहून आपल्याला खदखदून हसू आले. पण, वास्तवात अशाच बंटी-बबलीने नागपुरातील बँक खातेदारांना लाखोंचा गंडा घालून रडकुंडीला आणले आहे. या बंटी-बबलीने जादा व्याजदराचे आमिष दाखवून बँक खातेदारांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केली आहे. काही बँक खातेदारांच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी ‘बंटी-बबली ‘विरोधात पोलिसांत तक्रार केली. या बंटी-बबलीने शहराबरोबरच ग्रामीण भागातीलही खातेदारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या १९ लाख ६७ हजारांनी फसवणूक केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दिवसागणिक उपराजधानीतील गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. आजवर अनेक फसवणुकीच्या घटना समोर आल्या असून अशीच एक घटना पुन्हा उघडकीस आली आहे. फियादी दर्गा अनिल बिस्ट (२७, रा. गंगानगर, खरबी, वाठोडा) यांची २०१८ मध्ये आरोपी रिकेश रूपचंद रामवानी (रा. प्लॉट नं. १८, एकम इन्क्लेव्ह, नारी रोड, जनता हॉस्पिटलजवळ, जरीपटका), स्नेहा अशोक कटारिया (रा. फ्लॅट नं. १३५, निभर, कमलकुंज चौक, जरीपटका यांच्यासोबत धरमपेठ येथील कोटक महिंद्रा बँक येथे खाते उघडताना ओळख झाली होती. त्यावेळी खाते उघडताना रिंकेश आणि स्नेहा यांनी त्यांना मदत केली होती. त्यावेळी दर्गा बिस्ट यांनी त्यांचा मोबाइल नंबर घेतला. त्यानंतर आरोपींचे आणि बिस्ट यांचे वरचेवर बोलणे व्हायचे.
२०२० मध्ये दर्गा विस्ट यांना घाट रोड येथील एचडीएफसी बँक खाते उघडायचे असल्याने त्यांनी आरोपींशी संपर्क केला. त्यावेळी आरोपीने त्यांना तो स्वतः एचडीएफसी बँक येथे फिल्ड मॅनेजर असल्याचे सांगून बँकेत खाते उघडून दिले. यावेळी दर्गा बिस्ट यांच्या बँक अकाउंटमध्ये जास्त रक्कम दिसल्याने आरोपीचे डोळे विस्फारले. त्याने बिस्ट यांना बँकेपेक्षा जास्त व्याजदर मिळवून देतो, असे आमिष दाखविले. पूर्वीपासून ओळख असल्याने बिस्ट यांचा आरोपीवर विश्वास बसला. त्यानंतर २९ ऑगस्ट २०२० ते ९ एप्रिल २०२३ च्या दरम्यान आरोपीने विस्ट यांच्या बँक खात्यातून तसेच नगदी व गुगल पेद्वारे वेळोवेळी एकूण १९ लाख ६७ हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपीने बिस्ट यांना कोणतीही रक्कम परत न देता पैशाचा अपहार करून विस्ट यांची फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी दर्गा बिस्ट यांनी दिलेल्या तक्रारीवरून व अर्ज चौकशीवरून गणेशपेठ पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून शोध सुरू केला आहे. आरोपी पतिपत्नी असून, त्यांनी अशाप्रकारे इतरही लोकांची फसवणूक केल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. आरोपींनी वेगवेगळ्या बँकेतील खातेदारांना तसेच नागपूर शहराबाहेरील इतर खातेदारांनासुद्धा अशाचप्रकारे फसविल्याची पोलिसांना माहिती आहे. ज्या खातेदारांची फसवणूक झाली आहे, अशांनी गणेशपेठ पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस खात्यातर्फे करण्यात आले आहे.
खालील महत्वाच्या बातम्या वाचा …
आनंद सागरमध्ये भक्तांना आता निशुल्क प्रवेश
- Advertisement -
- Advertisement -
शेतकऱ्याने केला चक्क कांद्याचा अंत्यविधी!
उपराजधानीत विदेशी तरुणींकडून देहव्यापार
शरीरसुखास पती नकार द्यायचा, नंतर तिला जे कळलं ते खूपच धक्कादायक होतं..
शेतकऱ्यांची चिंता मिटली; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली पावसाबाबत महत्वाची माहिती
एसटी महामंडळाची आता आणखी एक मोफत प्रवास योजना!