Nagpur crime News
नागपूर : अजब प्रेम की गजब कहाणी ही कोणत्या चित्रपटातील नसून नागपूर शहरात घडली आहे. प्रेमासाठी वाटेल ते करण्याची तयारी असलेला प्रियकर आपल्या प्रेमिकेसाठी चक्क चोर बनला. मात्र या प्रेम कहाणीत ट्विस्ट आला आणि गुन्हेगार बनलेल्या प्रियकराला अखेर बेड्या पडल्या आहेत. प्रेमिकेला पबमध्ये पार्टी देण्यासाठी उसने घेतलेले पैसे चुकविण्यासाठी तो चक्क चोर बनला. प्रेमिकेची हौस करण्यासाठी प्रियकर बनला चोर बनल्याची ही घटना नागपूर शहरातील आहे. भावा मानलं तुला… अशी चर्चा आता शहरात गमतीने सुरु आहे.
चाकूचा धाक दाखवून ऐवज लुटला
एका चोरीच्या गुन्ह्यात हे प्रकरण उघडकीस आले. या घटनेची हकीकत अशी आहे की, एका वृद्ध महिलेला घरात भाजी निवडत असताना दोन आरोपींनी गळ्याला चाकू लावून ३७ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून नेला होता. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी अथक परिश्रम व तांत्रिक तपास करून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सुधा कृष्णकुमार गहरवार (६७), रा. प्लॉट नं. ३८/१९, जयदुर्गा सोसायटी नं. १, नरेंद्रनगर, बेलतरोडी, असे फिर्यादीचे नाव आहे.१३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास वृद्ध महिला या घरी भाजी निवडत बसल्या असताना अनोळखी आरोपी त्यांच्या घरात शिरले. त्यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, बेडरुम मधील ऑयपॅड आणि हाताची घड्याळ असा एकूण ३७ हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून पळून गेले. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाची चक्रे फिरविली. आरोपी अर्पीत रत्नाकर पोटे (२२), रा. प्लॉट क्र. ६०८, दर्शन कॉलनी, नंदनवन, धनंजय उर्फ राहुल भास्कर बारापात्रे (२३), रा. प्लॉट क्र. १०५, विजयालक्ष्मी पंडीत नगर, नंदनवन, यांना अटक केली. गुन्हा करतांना वापरलेली ४० हजारांची एम.एच. ४९/ बी.जी. ३०२६ किमती दुचाकी तसेच लोखंडी चाकू, आयपॅड, घड्याळ व सोन्याची पोत असा एकूण ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल केला.
सीसीटीव्हीच्या तपासातून आरोपींचा सुगावा
‘प्रेयसी वारंवार पार्टी मागते तसेच नवीन कपड्याची तिची हौस पूर्ण करता यावी, यासाठी प्रियकराने चोरी करण्याचा मार्ग पत्करला. त्या युवकाने मित्राच्या मदतीने बेलतरोडीतील धनाढ्य असलेल्या एका वृद्धेला घरात जाऊन लुटमार केली होती, हे चौकशीत समोर आले. या दोन्ही चोरट्यांना पोलीस उपायुक्तांच्या सायबर झोन पथकाच्या मदतीने अटक करण्यात आली. अर्पित रत्नाकर पोटे (२२, दर्शन कॉलनी, नंदनवन) आणि धनंजय उर्फ राहुल भास्कर बारापात्रे (२३, पंडितनगर, रमणा मारुती) अशी आरोपींची नावे आहेत. अर्पितने प्रेयसीला पार्टी देण्यासाठी ४० हजारांचे कर्ज घेतले होते व पैसे जमा करण्यासाठी त्याने धनंजयच्या मदतीने हे पाऊल सीसीटीव्हीच्या तपासातून पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींकडून दुचाकी जप्त
आरोपी हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. अर्पित ऑनलाइन फूड डिलिव्हरीचे काम करतो आणि धनंजय कार वॉशिंगचे काम करतो. अर्पितने ३१ डिसेंबरला त्याच्या प्रेयसीला पबमध्ये पार्टी दिली होती. त्यासाठी त्याने लोकांकडून पैसे घेतले होते. त्याच्यावर ४० हजार रुपयांचे कर्ज होते. तो पैसे परत करू शकला नाही. त्याने धनंजयला ही समस्या सांगितली. धनंजय हा गहरवार दाम्पत्याच्या घरी गाडी धुण्यासाठी येत असे. दोघेही एकटेच राहत असल्याचे त्याला समजले. सुधा दुपारी एकट्याच असतात हे त्याला माहीत होते. पोलिसांनी आरोपींकडून दुचाकी जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवघरे, प्रशांत सोनुलकर, मंगेश देशमुख, विवेक श्रीपाद, वर्षा चंदनखेडे, दीपक तऱ्हेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
- Advertisement -
- Advertisement -
साखळी व आयपॅड हिसकावून पळ
६७ वर्षीय सुधा कृष्णकुमार गहरवार या बेलतरोडी येथील नरेंद्रनगर येथे राहतात. त्यांचे पती बँकेत कायदेविषयक सल्लागार आहेत. मुलगा आणि मुलगी अमेरिकेत डॉक्टर आहेत. १३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता सुधा या घरी असताना चेहऱ्याला काळा कपडा बांधून दोन तरुण घरात आले. एकाने ‘काका आहेत काय’ असे विचारले. सुधा यांनी ‘आधी शूज बाहेर काढ’ असे म्हणताच तो तरुण बाहेर गेला व सहकाऱ्यासह परतला. त्याने सुधा यांच्या गळ्यावर चाकू ठेवला व जीवे मारण्याची धमकी देऊन आतील खोलीत नेले. तेथे रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू न मिळाल्याने त्यांनी सुधा यांच्या गळ्यातील साखळी व आयपॅड हिसकावून पळ काढला.