प्रशांत पाटील : ओटीटी न्युज
नांदुरा (Nandura News) : सततच्या कामाचा ताण,व्यस्त दिनचर्या, नेहमीच आरोपी, गुन्हे, भांडणे, कोर्ट, कचेऱ्या, खटले प्रशासकीय जबाबदाऱ्या या दातृत्वात व्यस्त राहून सामाजिक सुरक्षेसाठी सदैव तयार असलेल्या नांदुरा पोलीस प्रशासन संघ व नांदुरा बार असोसिएशन यांच्यात अजित इंटरनॅशनल स्कूल मध्ये 30 डिसेंबरला सकाळच्या आल्हाददायक वातावरणात अतिशय खेळीमेळीत क्रिकेटचा सामना रंगला.
नेहमीच कायदा, सुरक्षा यासारख्या कामाचा मानसिक ताण असणाऱ्या पोलीस प्रशासन व विधी सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढावा आणि कामासोबतच आपापसात उत्तम सलोखा, समन्वय राहावा या हेतूने नव वर्षाचे आनंदाने स्वागत करीत या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांचे तब्येतीकडे तसेच शारीरिक,मानसिक स्वास्थ्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. अशा प्रकारच्या खेळांच्या आयोजनातून त्यांचे शारीरिक मानसिक संतुलन राखण्यात मदत होते, म्हणून नियमित अश्या प्रकारच्या सामन्यांचे आयोजन करण्यात यावे असे यावेळी नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि पोलीस संघाचे कर्णधार अनिल बेहेरानी यांनी मनोगत व्यक्त केले.
या सामन्यासाठी वडनेर पोलीस स्टेशनचे एपीआय जायले सर, पीएसआय ढाकने मॅडम, पीएसआय महादेव धंदरे ,कैलास सुरडकर,शैलेश दादा,बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री चीमकर साहेब, टावरी साहेब, नवगजे साहेब, सय्यद साहेब, व दोन्ही कार्यालयाचे संघ तसेच अजित इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष श्री सुजित इंगळे यांची प्रमूख उपस्थिती होती.
- Advertisement -
- Advertisement -
दबंग व्यक्तीमत्व असलेल्या आपल्या निर्भीड कार्यप्रणालीने भल्या भल्यांची विकेट घेणारे व कडक कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रसिद्ध असणारे नांदुरा पोलीस प्रशासन संघाचे कर्णधार असलेले अनिल बेहेरानी यांनी या रंगतदार क्रिकेटच्या सामन्यातही उत्तम खेळासोबत संघाचे नेतृत्व करीत बॉलिंग करताना एक विकेट घेतली, तसेच काही धावा सुद्धा केल्या.पोलिस संघाकडून निंबोलकर व सपकाळ , दिपक सोळंके, अनंत वऱ्हाडे यांनी धुवाधार बॅटिंग करून वकील संघाला 100 धवांचे आव्हान दिले होते,वकील संघाकडून ,एकडे बाबू साहेब व ऍड मुळे साहेब यांनी छान फलंदाजी व गोलंदाजी करतं षटकारांचा वर्षाव केला.
तर पोलीस संघाकडून एपीआय जायले साहेब व पंकज वावगे यांनी छान गोलंदाजी करत वकील संघाला त्यांनी 87 रनवर रोखून 13 धवांनी विजय संपादन केला.या क्रिकेट सामन्याचे समालोचन PSI धंदरे साहेब व धिरबस्सी यांनी केले. यजमान असलेल्या आणि खेळाडू प्रवृत्तीला नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या अजित इंटरनॅशनल स्कुल तर्फे दोन्ही संघांना सर्व प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती