New Hero HF Deluxe : तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत व इंधन कार्यक्षम उत्पादनांचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ सादर करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेशी बांधील राहत हीरो मोटोकॉर्प कंपनीने त्यांची अत्यंत लोकप्रिय १०० सीसी मोटारसायकल एचएफ डिलक्सची उत्साहवर्धक नवीन श्रेणी लाँच केली आहे.
एचएफ डिलक्सच्या आकर्षक लूकमध्ये अधिक भर करत चार नवीन स्ट्राइप्स मोटारसायकलच्या एकूण डायनॅमिक लूकमध्ये वाढ करतात. तसेच कॅन्व्हास ब्लॅक एडिशन सुधारित सुरक्षितता व सोयीसुविधेच्या माध्यमातून ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांना नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. प्रमाणित वैशिष्ट्ये जसे सेल्फ व सेल्फ आय 3 एस व्हेरिएंट्समधील ट्युबलेस टायर्स ब्रॅण्डच्या उच्च मूल्य तत्त्वामध्ये अधिक भर करतील. यूएसबी चार्जर सोयीसुविधेसाठी ऍक्सेसरी म्हणून येते. परिपूर्ण मनःशांतीसाठी हीरो एचएफ-डिलक्स प्रमाणित पाच वर्षांची वॉरंटी आणि पाच मोफत सेवांसह येते.
ब्रॅण्ड डीएनए कायम राखत नवीन एचएफ डिलक्स पोर्टफोलिओमध्ये स्टाइल, सर्वोत्तम तंत्रज्ञान व कार्यक्षमतेचे योग्य संतुलन भारतातील सर्वात आहे ब्रॅण्ड्सपैकी विश्वसनीय एक मानली जाणारी एचएफ डिलक्स उच्च इंधन बचत मजबूत व शक्तिशाली इंजिनक्षमता राइडिंग आरामदायीपणाकिमान मेण्टेनन्स आणि लक्षवेधक रिसेल मूल्य यासाठी ग्राहकांची अल्टिमेट निवड आहे याबाबत हीरो मोटोकॉपर्चे चीफ ग्रोथ ऑफिसर रणजीवजीत सिंग म्हणाले, हीरो मोटोकॉर्पचे एण्ट्री सेगमेंटमधील नेतृत्व त्यांच्या सर्वोत्तम ब्रॅण्ड्सच्या वाढत्या लोकप्रियतेसह अधिक प्रबळ होत आहे.
- Advertisement -
- Advertisement -
New Hero HF Deluxe तिची कार्यक्षमता, उच्च इंधन कार्यक्षमता व विश्वसनीय राइडसह देशातील सर्वात विश्वसनीय मोटारसायकल आहे. आम्हाला नवीन श्रेणीमध्ये प्रीमिअम टचसह वैशिष्ट्याची, तसेच सुरक्षितता व सोयीसुविधेची भर करण्याचा आनंद होत आहे, ज्यामुळे तिचा मूल्य दर्जा वाढतो. एचएफ डिलक्स २० मिलियन सेल्स क्लबमध्ये आहे आणि नवीन सुधारित श्रेणीसह आम्हाला उत्साहवर्धक टप्पा संपादित करण्याचा विश्वास आहे, जो विभागामध्ये मोटारसायकलच्या असलेल्या प्रबळ बाजारपेठ हिस्स्यामध्ये अधिक भर करेल.
ही बातमी वाचा ..असे मिळवा दुग्ध व्यवसाय कर्ज आणि बना यशस्वी उदयोजक !