नागपूर :Nitin Gadkari threat- news- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश कांथा उर्फ शाकीर याने दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरून हे फोन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
बेळगावच्या तुरुंगात कैदेत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात दोन वेळा जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या जयेश कांथा उर्फ शाकीरचे संबंध एक नव्हे, तर अनेक प्रतिबंधित संघटनांशी होते. तो देशविघातक कारवायांमध्ये गुंतलेल्या अनेकांच्या संपर्कात होता. धक्कादायक बाब म्हणजे, देशविघातक कामांमध्ये सक्रिय असणाऱ्या लोकांशी त्याचा संपर्क बेळगाव जेलमध्ये येण्याच्या पूर्वीपासून होता. बेळगावच्या जेलमधूनही तो त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलीस करीत आहेत. आयुक्तांनी दिली आहे. जयेश उर्फ शाकीर सातत्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या प्रतिबंधित संघटनेसह लष्कर ए तोयबा आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांच्याही संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना तपासात मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणाचे काही धागेदोरे देशाच्या सीमेपलीकडेही जात आहेत. या सर्व अनुषंगानेनागपूर पोलीस केंद्रीय तपास यंत्रणांसह या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
‘यूएपीए ‘ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची शक्यता
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे फोन करणाऱ्या जयेश कांथा उर्फ शाकीरविरोधात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायदा म्हणजेच यूएपीए अंतर्गत दुसरा गुन्हा नोंदविला जाण्याची दाट शक्यता आहे. जयेश कांथा उर्फ शाकीरने बेळगावच्यातुरुंगात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात १४ जानेवारी आणि २१ मार्च असे दोन वेळा धमकीचे कॉल केले होते. धमकीच्या दुसऱ्या कॉलनंतर नागपूर पोलिसांनी बेळगावच्या तुरुंगातून जयेश कांथाला ताब्यात घेऊन नागपुरात आणले होते.
नागपुरात त्याच्याविरोधात २१ मार्चला दिलेल्या धमकी प्रकरणात यूएपीए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच जयेश कांथा नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे. तपासात समोर आलेल्या माहितीच्या आधारावर आता नागपूर पोलीस धमकीच्या पहिल्या कॉल प्रकरणात १४ जानेवारीला केलेला धमकीचा कॉल यूएपीए अन्वये गुन्हा दाखल करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी कर्नाटक पोलिसांनीही बेळगावमध्ये जयेश कांथा उर्फ शाकीर विरोधात बऱ्याच गुन्ह्यांची नोंद केली. गुन्ह्याची नोंद केल्यानंतर कर्नाटक पोलीस हे नागपूर पोलिसांकडून जयेशचा ताबा मागत आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत जयेश कांथाविरोधात नागपुरात यूएपीए अन्वये दुसरा गुन्हा नोंदविला जातो की त्याआधी कर्नाटक पोलीस जयेशचा ताबा घेतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
खालील महत्वाच्या बातम्या वाचा …
आनंद सागरमध्ये भक्तांना आता निशुल्क प्रवेश
शेतकऱ्याने केला चक्क कांद्याचा अंत्यविधी!
उपराजधानीत विदेशी तरुणींकडून देहव्यापार
शरीरसुखास पती नकार द्यायचा, नंतर तिला जे कळलं ते खूपच धक्कादायक होतं..
- Advertisement -
- Advertisement -
शेतकऱ्यांची चिंता मिटली; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली पावसाबाबत महत्वाची माहिती
एसटी महामंडळाची आता आणखी एक मोफत प्रवास योजना!