खामगाव : विदर्भातील सर्वात जास्त अभ्यास क्रम असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (Open University) अधिकृत अभ्यासकेंद्र कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, खामगाव केंद्र क्रमांक 1392-A मध्ये सत्र २०२3-२4 या शैक्षणिक सत्राकरिता अभ्यासाकेंद्रामार्फत पदवी, पदव्युत्तर पदवी, डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्स या विविध अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. आणि ही प्रक्रिया कॉलेज ऑफ मॅनेजमेंट येते आपल्याला करता येईल.
खामगाव परिसरातील शासकीय/ निमशासकीय व खाजगी नोकरवर्ग, गृहिणी, जि.प./पं.स. शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, ज्यांना आपले उच्च शिक्षण घ्यायचे आहेत परंतु परिस्थिमुळे घेऊ शकले नाही अश्या सर्व विद्यार्थ्यांनी खचून न जाता मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यास क्रमामध्ये प्रवेश घेऊन त्यांना सुद्धा आपले उच्च शिक्षण पूर्ण करता येऊ शकते.
कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमध्ये पदवी अभ्यास्क्रामध्ये बि.ए., बि.कॉम., बि.एस्सी. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास एम.ए. मराठी, हिंदी व इंग्रजी, अर्थशास्त्र, एम.एस्सी. (गणित), एम.कॉम., ह्युमन रिसोर्स/ फायनान्स/ मार्केटिंग / मॅन्युफक्चरिंग या विविध विषयामध्ये उपलब्ध आहे. तसेच मानवी हक्क हे प्रमाणपत्र अभ्यासक्रम व गांधी विचार दर्शन हे डिप्लोमा अभ्यासक्रमाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरु झालेली आहे. विद्यापीठाने अंध बांधव, शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य व यांना प्रवेशामध्ये विशेष सुट देण्यात आलेली आहे.तरी ज्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, दूरदर्शन केंद्राजवळ, वामन नगर खामगाव येथे 9960965566, 07263-295566 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट चे प्राचार्य राहुल अग्रवाल यांनी केले आहे.
शिक्षणात खंड पडला ,टेंशन नको ! आता आपलं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करून घडवा करिअर