Palghar Education News
पालघर : शासनाची मान्यता नसलेल्या १६ अनधिकृत शाळांवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत कारवाई करून संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुक्त शिक्षण विभागाच्या आदेशाने आणि मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पालघरमधील ५, तर वसईमधील ११ शाळांचा समावेश आहे. या शाळांना शाळा बंद करण्याबाबत वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या होत्या; परंतु तरीही शाळा अनधिकृतपणे सुरूच होत्या.मात्र, आयुक्तांच्या आदेशानुसार या शाळांवर कारवाई करण्यात आली.
सुमित्रा एज्युकेशन सोसायटी, डी. एस. मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल बोईसर, लिटिल एंजल प्रायमरी स्कूल बोईसर, मातोश्री आशादेवी विद्यामंदिर नगर शिगाव रोड, स्वामी विवेकानंद विद्यालय, सफाळे ज्ञानोदय विद्यामंदिर धोंदलपाडा, केळवे रोड या पालघर तालुक्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली तर वसई तालुक्यातील स्वामी विवेकानंद, सेंट झेव्हियर अँड मेरी कॉन्व्हेंट स्कूल, कुमर मेरी पब्लिक स्कूल,शांतिनिकेतन विद्यालय, लॉर्ड्स इंग्लिश स्कूल, गॉड ब्लेस स्कूल, चिल्ड्रन वेल्फेअर स्कूल, पोल स्टार इंग्लिश स्कूल, मोहम्मदी उर्दू प्रायमरी स्कूल, शारदा निकेतन आणि शारदा विद्यामंदिर या शाळांवर कारवाई करण्यात आली. अनधिकृत शाळांवरील कारवाईचा बडगा सुरूच राहणार असून, पालकांनीदेखील आपल्या पाल्यांना प्रवेश घेते वेळी शहानिशा करणे गरजेचे असून, शासन मान्यता असलेल्या शाळेतच पाल्यांचा प्रवेश करावा, असे आवाहन शिक्षण विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या मार्फत करण्यात आले आहे.
खालील महत्वाच्या बातम्या वाचा …
शरीरसुखास पती नकार द्यायचा, नंतर तिला जे कळलं ते खूपच धक्कादायक होतं..
शेतकऱ्यांची चिंता मिटली; हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली पावसाबाबत महत्वाची माहिती
- Advertisement -
- Advertisement -
एसटी महामंडळाची आता आणखी एक मोफत प्रवास योजना!
कसा घडतो सायबर क्राईम; वाचा या पाच घटना आणि अशी टाळा फसवणूक
बुलढाणा जिल्ह्यातील भेडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर