Scheme of ST Bus
मुंबई : एसटी महामंडळात (ST Corporation) महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेंतर्गत (Women’s Honor Schemes) अवघ्या महिनाभरात तब्बल ४ कोटी २२ लाख महिलांनी अर्ध्या तिकिटात एसटीचा प्रवास करून उत्तम प्रतिसाद दिला आहे. केवळ महिला सन्मान योजनेमुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत ६ लाखांची भर पडली आहे. दरम्यान आता एसटी महामंडळाने आणखी एक मोफत प्रवास योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या बाबतीत माहिती आपण जाणून घेऊया…
राज्य शासनाने २०२३- २४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याला उदंड प्रतिसाद लाभला. एका महिन्यात चार कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. प्रवाश्यांच्या सेवेसाठी हे ब्रीद असलेली राज्य परिवहन मंडळाची बससेवा म्हणजे त्याची लोकवाहिनी म्हणून ओळखले जाते. ऊन पाऊस, थंडी कोणताही मौसम असो प्रवाशांना सुखरूप घरी पोहोचवण्याचे काम एसटी बस सेवेच्या माध्यमातून होत असते. सरकार आणि एसटीच्या पुढाकारातून प्रवाशांसाठी विविध योजना सुद्धा राबवल्या जात असतात. निश्चितच त्याचा फायदा प्रवाशांना होतो विद्यार्थ्यांपासून, महिला, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध सुविधा एसटी पुरवत असते.
एसटी बसची ‘ही’ सुविधा घ्या; राज्यात कोठेही आणि कितीही वेळा प्रवास करा!
- Advertisement -
- Advertisement -
एसटी महामंडळाने ७५ वर्षे वयाच्या नागरिकांसाठी अमृत योजनेंतर्गत मोफत प्रवासाची सवलत सुद्धा सुरू केली आहे. तसेच ६५ वर्षे वयावरील नागरिकांना प्रवासात ५० टक्के सवलत दिली जात आहे. या उपक्रमाला ज्येष्ठ प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सवलत घेणाऱ्यांची संख्या एक कोटीपेक्षा अधिक आहे. यात आणखी वाढ व्हावी याकरिता महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. पुरुषाच्या तुलनेत महिला खूप मोठ्या प्रमाणात प्रवास करताना दिसून येतात. अगोदर एसटी महामंडळची टाइमिंग गाडी यायच्या अगोदर खाजगी वाहनधारक मग काळी-पिवळी टॅक्सी असो अथवा ऑटोरिक्षा असे वाहनधारक जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त प्रवासी कसे मिळतील म्हणून मागेपुढे सर्रास धावताना दिसत होते, पण अर्धी तिकीट सुरू झाली तेव्हापासून महिला इतर वाहनांमध्ये प्रवास न करता बसनेच प्रवास करताना दिसन येत आहेत.
आणखी एक मोफत योजना
दरम्यान आता आणखी एक मोफत प्रवास योजना जाहीर होत असून ज्येष्ठांसाठी देवदर्शनाची विशेष सुविधा महामंडळाकडून सुरू करण्यात येत आहे. याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच दिले आहेत. याबाबत लवकरच शासननिर्णय देखील जाहीर करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन घडविण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी नुकतीच बैठक घेतली. यामध्ये आवश्यक त्या सूचना महामंडळाला करण्यात आल्या होत्या. आता ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन घडविण्यात येणार असून यासाठी महामंडळाने तयारी सुरु केली आहे. प्रत्येक शनिवारी-रविवारी ज्येष्ठ नागरिक मोफत देवदर्शन करू शकणार आहेत. यासाठी दोन हजार एसटी उपलब्ध करून देण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवली आहे. या सेवेचा लाभ घेताना केवळ प्रवास मोफत असणार आहे. प्रवासादरम्यान ज्येष्ठ प्रवाशांना राहण्याचा आणि जेवणाचा खर्च करावा लागणार असल्याचे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांचा समावेश
पंढरपूर-तुळजापूर-अक्कलकोट, अष्टविनायक दर्शन, शिर्डी, शेगाव, कोल्हापूर, ज्योतिबा दर्शन आदी तीर्थक्षेत्रांना भेटी देण्याकरता हा प्रवास मोफत करण्यात येणार आहे. या तीर्थक्षेत्रांमध्ये असलेल्या धर्मशाळा, यात्रीनिवास येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव खोल्या ठेवण्यात येणार आहेत.सरकार जेवढ्या सवलती वाढवेल तेवढा एसटी महामंडळाला फायदा आहे. सद्य स्थितीत महामंडळाला सवलत मूल्याचे वर्षाला १,८०० कोटी रुपये मिळतात. राज्य सरकारची एसटीच्या माध्यमातून देवदर्शन संकल्पना अतिशय चांगली आहे, अशी प्रतिक्रिया श्रीरंग बरगे, (सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस) यांनी व्यक्त केली आहे. सध्या सुट्या सुरु आहेत. त्यामुळे लोक परिवारासह फिरायचे बेत आखत असतात. विशेष करून तीर्थाटन करण्यावर त्यांचा भर असतो. सरकारच्या प्रवासात विविध सेवा दिल्या जात असल्याने त्याचा फायदा प्रवासी घेताना दिसून येत आहेत.
खालील लिंकवर टच करून महत्त्वाची बातमी वाचा
समृद्धी महामार्गाने प्रवास करायला जाताय, जाणून घ्या नवीन नियम !