Superfood for kids
मुंबई : मुलांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक अर्थात superfood त्याना मिळणे गरजेचे आहे. मुलांना मानसिकदृष्ट्या कुशल बनविणे ही प्रत्येक पालकाची इच्छा असते, त्यासाठी मेंदूचा विकास हा योग्यरीत्या होणे हे देखील तेवढे महत्वाचे असते. यासाठी जर तुम्ही सुरुवातीपासूनच तुमच्या लाडक्याचा जेवणाची काळजी घेतली तर तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल.
मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. आपण पहिले असेल कि अनेकदा लहान मुलांना मसालेदार किंवा गोड पदार्थ खायला आवडतात. परीक्षेत ते कितीही चांगले दिसत असले तरी ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. म्हणूनच आज आपण असे कोणते सुपरफूड आहेत जे आपण आपल्या मुलांना खायला देणे गरजेचे आहे. याबाबत जाणून घेऊ
1. दूध : शरीराच्या वाढीसाठी दूध हे अत्यंत महतवाचे असते. कोणत्याही कारणाशिवाय दुधाला पूर्ण अन्न म्हटले जात नाही. त्यामध्ये ते सर्व पोषक असतात जे आपल्या लहान मुलांसाठी खूप महत्वाचे आहेत. त्यात व्हिटॅमिन डी, फॉस्फरस, कॅल्शियम आणि इतर अनेक पोषक घटक असतात. म्हणूनच मुलांचा आहार कमी करू नका.
2. अंडी : शरीराच्या वाढीसाठी, तसेच हाडांच्या बळकटीसाठी अंडे हे खूप महत्वाचे मानले जाते. लहानापासून ते वायोवृद्धांपर्यन्त याचे सेवन करू शकता. अंडी हे सर्व वयोगटातील लोकांसाठी सुपरफूडसारखे आहे. तुमचे मूल एक वर्षाचे झाल्यावर त्याला अंडी खायला द्या. यामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-डी, ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि फॉलिक अॅसिड मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे मुलांचा योग्य मानसिक विकास होतो.
- Advertisement -
- Advertisement -
3. सुकी फळे : बुद्धीच्या वाढीसही सुकामेवा हा अत्यंत फायदेशीर ठरला जातो. तसेच आरोग्य तज्ञ् देखील हे खाण्याचा सल्ला नेहमी देत असतात. काजू, बदाम, सुके अंजीर आणि अक्रोड यांसारखी सुकी फळे आपल्या मुलांसाठी खूप फायदेशीर आहेत, ते फक्त त्यांचे मन तीक्ष्ण करत नाहीत तर शरीराला भरपूर ऊर्जा देतात. म्हणूनच त्याचे कमी प्रमाणात सेवन करत रहा.
4. हिरव्या भाज्या : हिरव्या भाज्या आपल्या आणि मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, यातून शरीराला अनेक प्रकारचे पोषक तत्व मिळतात. मुलांच्या रोजच्या आहारात पालक, ब्रोकोली, कोबी यासारख्या गोष्टींचा समावेश जरूर करावा.
Superfood for kids